दिवाळी पाडव्याला दसऱ्याहून अधिक सोने-चांदीची उलाढाल...सराफ पेठेत दिवसभर गर्दी 

jwelary.jpg
jwelary.jpg
Updated on: 

सांगली-  कोरोनाच्या सावटात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला प्रचंड उत्साह दिसून आला. तर दिवाळी पाडव्याला दसऱ्याहून अधिक सोने-चांदी खरेदीची उलाढाल झाल्याचे चित्र दिसले. सांगलीतील सराफ पेठेत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड गर्दी दिसली. दसऱ्याला जवळपास 12 कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज होता. दिवाळीला त्याहून अधिक म्हणजे 15 कोटीपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

लॉकडाउनच्या काळात सोने-चांदी दरात प्रथमच मोठी वाढ झाली. सोने दराने 50 हजाराचा टप्पा ओलांडला. सोन्याचा दर सर्वाधिक 56 हजारापर्यंत तर चांदीचा किलोचा 75 हजारापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे दोन-तीन महिन्यापूर्वी सोने-चांदी खरेदी म्हणजे सामान्यांसाठी सुवर्णस्वप्नच बनले होते. लॉकडाउनचा परिणाम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे सोने-चांदी दराने उसळी मारली होती. त्यामुळे सराफ पेठेत फारसा उत्साह दिसत नव्हता. त्यानंतर गेल्या काही दिवसात सोने-चांदी दरात घसरण झाली. त्यामुळे सराफ पेठेत हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफ पेठेत उलाढाल वाढणार काय? याची उत्सुकता असताना सोने-चांदी खरेदीला मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला गेला. दसऱ्याला जिल्ह्यात सोने-चांदीची उलाढाल जवळपास 12 कोटींची झाल्याचा अंदाज होता. त्यामुळे दिवाळी पाडव्याला त्याहून अधिक उलाढाल होईल अशी शक्‍यता वर्तवली जात होती. हा अंदाज सोमवारी (ता.16) पाडव्याच्या दिवशी खरा ठरला. सकाळपासून सराफ पेठ गर्दीने फुलल्याचे चित्र दिसले. पेठेच्या बाजूचे रस्ते दुचाकी, चारचाकी गाड्यांनी झाकले गेले. सकाळपासून रात्री दुकान बंद करण्याच्या वेळेपर्यंत गर्दी दिसून आली. कोरोनामुळे लॉकडाउन काळात सराफ पेठेतील गायब झालेला उत्साह काल पहायला मिळाला. दसऱ्यापेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 15 कोटीपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ पेठेतून वर्तवला जात आहे. उलाढालीपेक्षा बाजारपेठ पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू झाल्याचा आनंद दिसून आला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com