अय, मी काय म्हणतो...मी घरी बसलोय तुमीपण बसा...इंदोरीकर महाराजांचे आवाहन

शांताराम काळे
रविवार, 22 मार्च 2020

हा कोणा एकट्या-दुकट्याचा वा निव्वळ शासन, प्रशासनाचा नव्हे तर आपणा सर्वांचा लढा आहे. राज्यात 63 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सतर्क होत, खबरदारी घेण्याची गरज आहे.

अकोले : राज्यात आज 60च्या पुढे करोनाबाधितांचा (रुग्णांचा) आकडा गेला आहे. त्यामुळे कोरोनापासून आपले गाव आपले शहर आपले राज्य आपला देश मुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचे आहे. हा कोणा एकट्या-दुकट्याचे काम नाही.

पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी आता राम कृष्ण हरी म्हणत, कोरोनासंदर्भातील लढाईत सक्रीय होत ‘आपलं गाव, आपलं शहर आणि आपला देश’ कोरोनामुक्त करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

इंदोरीकर महाराजांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करत ‘गाव, शहर आणि देश जर कोरोनामुक्त करायचा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणं गरजेचं आहे. हा कोणा एकट्या-दुकट्याचा वा निव्वळ शासन, प्रशासनाचा नव्हे तर आपणा सर्वांचा लढा आहे. राज्यात 63 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सतर्क होत, खबरदारी घेण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करा. आपण आणि आपलं कुटुंब करोना विषाणूपासून दूर ठेवा.

घराबाहेर पडू नका. प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या’, असं म्हटलं आहे.‘मी पण घरी आहे, तुम्हीपण घराबाहेर पडू नका’इंदोरीकर महाराज यांनी आपल्या चाहत्यांना आणि समाजाला या पत्राद्वारे एक संदेश दिला आहे.

ते म्हणतात, ‘मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका, शासनाला सहकार्य करा, वारंवार हात स्वच्छ करा’.31 मार्चपर्यंतचे कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या पुढील काही तारखा बुक झालेल्या आहेत. इंदोरीकरांनी 31 मार्चपर्यंत राज्याच्या विविध भागातील आपले नियोजित कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not leave the house, Indorekar Maharaj's advice