
गाव कारभारी म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी कोणताही दुजाभाव, आकस, सूडबुद्धी न ठेवता आपल्या गावचा सर्वोत्तम विकास करावा असे आवाहन भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि कनकेश्वर परिवर्तन पॅनेलचे मार्गदर्शक दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी केले.
म्हैसाळ : गाव कारभारी म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी कोणताही दुजाभाव, आकस, सूडबुद्धी न ठेवता आपल्या गावचा सर्वोत्तम विकास करावा असे आवाहन भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि कनकेश्वर परिवर्तन पॅनेलचे मार्गदर्शक दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी केले.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे परिवर्तन पॅनेलने आयोजित केलेल्या विजयी आभार सभा आणि सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. पॅनेलप्रमुख आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, श्रीमती अलकादेवी शिंदे-म्हैसाळकर, दुर्गादेवी शिंदे-म्हैसाळकर, पुष्पराज शिंदे-म्हैसाळकर, दिलीपकुमार पाटील, महावीर पाटील, धनंजय कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ""गेल्या दहा वर्षापासून जनतेच्या वाट्याला आलेले कटू अनुभव आगामी पाच वर्षाच्या काळात निश्चितच येणार नाहीत. जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू. गावात नवीन उद्योग उभा करण्यासाठी गावातील व्यापारी वर्गाने आणि नव उद्योजकांनी पुढे आल्यास आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू. पॅनेलप्रमुख आबासाहेब शिंदे म्हणाले, ""ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे करण्यावर आमचा भर राहणार आहे. गावातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभाच्या योजना आम्ही पोचविणार आहोत.''
पुष्पराज शिंदे म्हणाले, ""गावातील नागरिकांना माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करण्याची आम्ही संधीच देणार नाही कारण आमच्या कारभाराची माहिती जाहीरपणे नोटीस फलकावर प्रसिद्ध करणार आहोत.'' धनंजय कुलकर्णी, गणेश निकम, रश्मी आबासाहेब शिंदे, वैशाली पुष्पराज शिंदे, राहुल पाटील, आप्पांणा चौगुले, शिवलिंग सनबे, श्रीशेल कोटीवाले, एकनाथ बागडी, आशा मराठे, चिदानंद हिरेमठ, मेघा खांडेकर, सूर्यकांत गिड्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मानसिंग शिंदे-म्हैसाळकर, आनंत कुलकर्णी, एन. डी. पाटील, डी. आर. शिंदे, महादेव शेजवळकर, मनोज जाधव, वसंत सपकाळ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विनोद शिंदे तर आभार विठ्ठल बंडगर यांनी मानले. सूत्रसंचालन सुनील बेळवे यांनी केले.
संपादन : प्रफुल्ल सुतार