आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

doesnt need to be scared Corona virus
doesnt need to be scared Corona virus

सध्या चीनमधून जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसची मोठी भिती आणि चर्चा आहे. माध्यमांमधून त्यावर रोज नवनवी माहिती पुढे येत आहे. अशावेळी या माहितीतून सत्य काय हे समजून घेणे आवश्‍यक आहे. भितीपेक्षा काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध उपयुक्त माहिती. 

लक्षणे कोणती? 
कोरोना व्हायरस हा विषाणू समुह आहे. चीनमधील वुहान प्रातांत 31 डिसेंबर 2019 रोजी तो आढळला होता. नोव्हेल कोरोना व्हायरस असं त्याचं नामकरण झाले आहे. सापांपासून त्याचा संसर्ग माणसांना झाल्याचे काही डॉक्‍टरांचं मत आहे. मात्र अद्याप त्याचा नेमका स्त्रोत निश्‍चित नाही. याची लागण झाल्यापासून लक्षणे दिसायला सुमारे अकरा दिवस लागतात. सर्वसाधारण ताप किंवा सर्दी खोकल्याचीच या विषाणूची लक्षणे असून चीनमधून आलेल्यांपासूनच सध्या अधिक धोका आहे. 

मृत्यूचा धोका किती? 
आत्तापर्यंत चीनमध्ये 24 हजार 579 जणांना लागण झाली आहे. त्यातील सहाशेंवर जणांना मृत्यूने गाठले आहे. चीनशिवाय इतर देशांमध्ये रुग्ण आढळत असले तरी त्यांचे मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. त्याचवेळी सुमारे नऊ हजार जण उपचारानंतर रोगमुक्त झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण दोन टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांची प्रतिकार क्षमता खूपच कमी होती. ते ज्येष्ठ होते. ही सर्वात दिलासा देणारी माहिती आहे. जो व्हायरस गतीने पसरतो त्यापासूनचा मृत्यूचा धोका कमी असतो असं वैद्यकीय शास्त्रात सांगितले जाते. ज्यांचा फैलाव कमी असतो त्यांच्यापासूनचा मृत्यूदर जास्त असतो. इबोला सारख्या व्हायरसचे त्यासाठी उदाहरण देता येईल. त्याची तीन हजार जणांना लागण झाली होती.त्यातील सत्तर टक्के रुग्णांना मृत्यूने गाठले. सार्सचा मृत्यूचा धोका दहा टक्के होता. त्यामुळे इथं करोना व्हायरस बाबत त्याचा फैलाव पाहता मृत्यूचा धोका कमी आहे. त्यामुळे सार्स इबोलाच्या तुलनेत कोरोना व्हायरसपासून मृत्यूचा धोका कमी आहे. 

हे पण वाचा - सरकारी जमिनी विका मालामाल व्हा 

उपचार आहेत का? 
सध्या तरी या व्हायरसपासून बचावासाठी नामी अशी लस उपलब्ध नाही. सध्या तरी प्रतिकार क्षमता हीच या विषाणूपासून बचावासाठी उपयोगी ठरु शकते. याची लस येण्यासाठी किमान वर्षभर लागू शकेल. बाधित रुग्णांमध्ये सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे. तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. लस नसल्याने एरवीच्या पध्दतीने जगभर उपचार सुरु आहेत. 

काळजी काय घ्याल? 
खोकला सर्दीप्रमाणे या व्हायरसचा फैलाव होतो. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवा. खोकताना रुमालाचा उपयोग करा. बचावासाठी मास्कचा उपयोग फारसा होत नाही. मात्र ज्यांना लागण झाली आहे अशा व्यक्तीपासून फैलाव रोखण्यासाठई मास्कचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो. मात्र सध्या त्याच्या बचावाबाबत केले जाणारे हास्यास्पद दावे पाहता त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. 

संशय वाटत असेल तर डॉक्‍टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास टाळा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com