सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; वीस जणांचा घेतला चावा

कुत्रा
कुत्रा
Updated on

आरग ( मिरज) : बेडग (ता. मिरज) येथील गावात भटक्या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवार व सोमवार या दोन दिवसांत एकाच पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे वीस जणांना चावा घेतला. पाळीव प्राण्यांसह देशी पाडीवरही कुत्र्याने हल्ला केला. येथील बिंदले कुटुंबातील एक वर्षीय लहान बाळाच्या मानेवर व आईवर कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (dog-bit-about-twenty-people-in-sangli)

येथील मंगसोळी रस्त्यांवरील खांडेकर- कोरे वस्तीत १२ जणांना तर गावातील गावठाण हद्दीत ८ जणांना कुत्र्याने चावा घेत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यात चार वृद्ध व्यक्तिंचा समावेश आहे. मंगसोळी रस्त्यांवरील आरोही काशिनाथ शेळके (वय ३) व शिवानी काशिनाथ शेळके (वय ८ ) ही समोरील अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला करत शरीराचा चावा घेतला. घरातील व्यक्ती त्यास कुत्र्याच्या तावडीतून सोडवून दवाखान्यात दाखल केले.

मात्र, आरग बेडग येथील सरकारी रुग्णालयात उपचाराची सोय नसल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा गावातील गावठाण हद्दीत आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. बेडग येथे गेल्या काही दिवसांपासून बेवारस व मोकाट कुत्र्यांची मोठी संख्या वाढली आहे. गावातील व वाडी वस्तीवरील जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले करतात. एकट्या दुकट्या लहान मुलाला खेळताना किंवा रस्त्याने जाताना गाठून चावा घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com