Don't let the Valmiki go down!
Don't let the Valmiki go down!

वाल्मिकीचा वाल्या होऊ देऊ नका ! 

कोल्हापूर : शासनाने आमची जात हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडे जातीचा पुरावा मागतात, "आमचा बाप कोळी म्हणून आम्ही कोळी, हाच आमचा पुरावा. जगाला राम दाखवणारे वाल्मीकी कोळी समाजाचे होते, एवढी आमची परंपरा आहे. म्हणूनच आम्हाला विनाअट जातीचे दाखले द्या. आम्हाला "वाल्मिकीचा वाल्या' होऊ देऊ नका. असा गर्भित इशारा कोळी समाजाने शासनाला दिला. भव्य 
मोर्चाद्वारे निवेदन देऊन त्यांनी शासन दरबारी मागण्या मांडल्या. 

कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळातर्फे आज मोर्चा काढला. टाऊन हॉल बागेमध्ये कोळी समाज बांधव एकत्रित आले. तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा सीपीआर, चिमासाहेब महाराज चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज, उद्योग भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चात कोल्हापूरसह सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर, बेळगाव, निपाणी, पुणे येथून मोठ्या संख्येने कोळी बांधव आले होते.

जि. प. सदस्य विजय भोजे म्हणाले,"शासनाने आमची जातच आमच्यापासून हिरावून घेण्याचे ठरवले. हे आदिवासी, मुलनिवासी आहोत. आमच्या वाडवडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारीही काम केले. कोळी बांधवांनी आपल्या महिनेतीने जीवन सुधारले.

मात्र ,शासनाला आमची जातकुळी कोणती ते कळेना,म्हणून आदेश काढून आमच्या नोकऱ्या काढून घ्यायला लागेल आहेत. महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, डोंगरी कोळी हे सर्व आदिवासी आहेत. सरकारने विनाअट कोळी बांधवांना जातीचे दाखले द्यावेत' मोर्चात प्रा. बसवंत पाटील, प्रा.बी.एस गुरव, बाळासाहेब शिरपूर, अमोल नांद्रेकर, अंजली कोळी, संपदा कोळी, सुवर्ण कोळी आदी सहभागी झाले. 

प्रमूख मागण्या अशा : 
- जात पडताळणी निवृत्त न्यायाधिशांच्या 
अध्यक्षतेखाली समितीने करावी 
- समितीत समाजशास्त्रज्ञ, वकील, समाजसेवका हवेत 
- समितीने 1980 ते आजअखेरचे सर्व वैध, अवैध दावे तपासावेत 
- कोळी ही जनरिक टर्म आहे. हे सुस्पष्ट व्हावे 
- विशेष मागास वर्ग कायमचा रद्द करावा 
- अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे 
- सर्वांना समान दर्जा, न्याय व वागणूक द्यावी 
- विना अट सर्व कोळी बांधवांना जातीचे दाखले मिळावेत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com