डबल सीट... स्वागत आहे... भरा 2200... उठाबशा अलग से ! 

अजित झळके
Friday, 17 July 2020

नमस्कार... दुचाकीवर डबल सील आलेला आहात... तुमचे स्वागत आहे... चला, खिशात हात घाला आणि बाविसशे (2,200) काढा... पावती करा... शिवाय, उठाबशा आहेतच..! 

सांगली ः नमस्कार... दुचाकीवर डबल सील आलेला आहात... तुमचे स्वागत आहे... चला, खिशात हात घाला आणि बाविसशे (2,200) काढा... पावती करा... शिवाय, उठाबशा आहेतच..! 

सांगलीतील रस्त्यारस्त्यावर हा नियम आता कडक राबवला जात आहे. आजपासून त्याची जोरदार अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे पोलिस दल रस्त्यावर उतरले आणि तर दुसरीकडे महापालिकेने निवृत्त सैनिकांचा टास्क फोर्स नेमला आहे. सीमेवर सक्त असणारे माजी सैनिक कोरोना विरोधातील लढाईत सेवा बजावत आहेत. त्यांच्या गर्द हिरव्या, खाकी रंगाच्या गणवेशाची एक वेगळीच धास्ती लोकांना वाटू लागली आहे. मास्कशिवाय फिरणाऱ्यांना आता काठी बसेल, याची भिती वाटायला लागली आहे. शिस्त म्हणजे शिस्त म्हणत या मंडळींनी उठाबशाची शिक्षा सक्तीने सुरु केली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक शिस्तीचे आदेश दिले आहेत. शिस्तीत रहाल तर मोकळा श्‍वास घ्याल, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे, अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. त्यासाठी आजपासून डबल सीट फिरणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे. दुकानांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणली जात आहे. भाजीपाला बाजारातील झुंबड कमी केली जात आहे. उगाचाच हुंडारणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला जात आहे. कारण नसताना घरातून बाहेर पडू नका, असे सक्त आदेश आहेत. 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 841 झाली आहे. गुरुवारी 76 आणि शुक्रवारी 62 रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. सांगली, मिरज शहरातील कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या घरात गेली आहे. जिल्ह्यातही वेग पकडला गेला आहे. त्यामुळे ही सक्ती गरजेची आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double seat ... Welcome ... Fill 2200 ... Get up separately!