आज पासुन ‘फास्ट टॅग’ नसलेल्या 'या' वाहनांना टोल रक्कम दुप्पट

Double the toll amount for vehicles without 'fast tag'
Double the toll amount for vehicles without 'fast tag'

कोल्हापूर - देशातील सर्व प्रकारच्या वाहनांना (दुचाकी वगळून) ‘फास्ट स्टॅग’ वापरणे (ता. १५) पासून बंधनकारक करण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या या ‘फास्ट टॅग’च्या बंधनाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ उद्या संपत आहे. देशांतर्गत दळणवळणात या ‘फास्ट टॅग’मुळे सुसूत्रता येईल. ‘फास्ट टॅग’ नसलेल्या वाहनांना मात्र टोलची रक्कम दुपटीने द्यावी लागेल.

दुचाकीस्वारांना दिलासा ; दळणवळणात सुसूत्रता​

‘फास्ट स्टॅग’ हे प्रीपेड स्वरूपाचे आहे. ‘फास्ट टॅग’ खरेदीसाठी देशातील २३ बॅंकांचे सेल पॉइंट सुरू करण्यात आले. ऑनलाईनही ‘फास्ट टॅग’ खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ‘फास्ट टॅग’साठी अधिकतम १०० रुपयांचे मूल्य निश्‍चित केले आहे. शिवाय, यात बॅंक सिक्‍युरिटी डिपॉझिट, रिचार्ज याची रक्कम अधिक द्यावी लागेल. याची रक्कम विविध बॅंकांच्या ‘फास्ट टॅग’ सर्व्हिसनुसार वेगवेगळी आहे. जी ४०० रुपये ते ६०० रुपये असेल.

बॅंकांनाही ‘फास्ट टॅग’ सुविधेशी जोडले

कोल्हापूरमध्ये शासनाने ‘फास्ट स्टॅग’ खरेदीच्या माहितीसाठी माय फास्टॅग ॲप (MY FASTag App) बनविले आहे. या ॲपद्वारे ‘फास्टॅग’ कुठे मिळेल, याची माहिती घेता येते. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) शॉपिंग साइटवरून ‘फास्ट टॅग’ ऑनलाइन खरेदी करता येईल. २३ बॅंकांनाही ‘फास्ट टॅग’ सुविधेशी जोडले आहे. यासाठी कोल्हापूरमध्ये आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, एसबीआय बॅंक या बॅंकांच्या ठराविक शाखांमध्ये हे ‘फास्ट टॅग’ उपलब्ध आहेत. ‘फास्ट टॅग’ विक्रीसाठी वितरकही नेमले आहेत.

‘फास्ट टॅग’ नसलेली गाडी विशेष लेनमध्ये आल्यास दंड

देशांतर्गत दळणवळणासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांना (दुचाकी वगळून) ‘फास्ट टॅग’ बंधनकारक केले आहे. जर गाडीला ‘फास्ट टॅग’ नसेल आणि गाडी ‘फास्ट टॅग’साठी बनवलेल्या टोल विशेष लेनमध्ये अाल्यास दंड म्हणून दुप्पट टोलवसुली केली जाईल. 

टोल नाक्‍यावर विक्रीची सोय

महामार्गावरील टोल नाक्‍यावर हे ‘फास्ट टॅग’ विक्रीची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या आधीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाचे एकूण ५३७ टोल नाके आहेत. यापैकी ४१२ टोल नाक्‍यांवरील सर्व लेन ‘फास्ट टॅग’ने संचलित केल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com