बियाणे दडपण्याची शक्यता, पेरणीसाठी वापसा नाही... या तालुक्‍यातील चित्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

झरे (सांगली) - झरे  (ता. आटपाडी) परिसरात दिवसभर उन्हाचा तडाखा तर संध्याकाळी पाऊस त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. त्यांचे बियाणे उगवते की नाही याची शंका आहे कारण चार ते पाच दिवसापासून संध्याकाळी सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे बियाणे धडकण्याची शक्यता आहे.ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे,आसे शेतकरी बियाणे उगवते की नाही याने चिंताग्रस्त आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही असे शेतकरी रानाला वापसा कधी येणार व पेरणी कधी होणार यासाठी चिंताग्रस्त आहेत.

शेतकरी राजा आहे हे फक्त पुस्तकात वाचायला चांगलं वाटतं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांची अवस्था बघितली तर फार बिकट आहे .एकतर मशागत करण्यासाठी पेरणी करण्यासाठी खते औषधासाठी पैसे नसतात कशीतरी जुळवाजुळव करून रानाची मशागत बी बियाणे याची जुळणी लावलेली असते परंतु बऱ्याच वेळेला निसर्ग साथ देत नाही त्यामुळे शेतकरी कायमच तोट्यात गेलेला आहे.कोणतेही पीक केलं तरी त्याच्या वरती रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यावरती फवारणी केली असता भेसळ औषधामुळे फरक पडत नाही .औषधे,बियाणे मध्ये भेसळ. असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.त्यामुळे उत्पादन कमी प्रमाणात निघत असल्याने शेतकरी तोट्यात जातोय.

मागील वर्षी अवकाळीने रब्बी हंगामामध्ये पिकांमधून भरपूर प्रमाणात तन उगविले होते. या वर्षी खरीप हंगामाची शेतकऱ्यांनी तयारी केली अनेकांच्या मशागती सुरू होत्या काही जणांनी पेरणी केली आहे तर काही जणांची मशागत करून राने तयार आहेत ,पेरायचं आहे, परंतु पाच ते सहा दिवसांमध्ये दिवसभर उन्हाचा तडाखा सुरू आहे. तर संध्याकाळी पाऊस पडतोय त्यामुळे राणाला वपसा नाही मग पेरणी तरी कशी करायची आणि ज्यांनी पेरणी केली आहे त्यांचंही बियाणं सतत च्या पावसामुळे बियाणे उगवतं की नाही यामध्ये शंका आहे म्हणजे शेतकऱ्यांना मागे आड-पुढे विहीर अशी अवस्था झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doubt whether the seeds germinate