नागरिकत्व सुधारणा विधेयकावर डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले,

Dr Amol Kolhe Comment On Citizenship Improvement Bill
Dr Amol Kolhe Comment On Citizenship Improvement Bill

सांगली - देशाची फाळणी झाली तेव्हा अनेकजण त्यात पोळून निघाले. त्या भळभळत्या जखमेच्या आठवणी नागरिकत्व संशोधन विधेयकामुळे जाग्या होत आहेत. जुन्या जखमांवर फुंकर घालून त्यांना दुरुस्त करण्याऐवजी त्या उकरुन काढण्याचे काम या विधेयकाने होत आहे. देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे लोक विरोधकांची दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. 

सांगलीवाडी येथील टोलनाक्‍याशेजारील चौकाचे सुशोभिकरण, स्व. प्रकाश मोहिते यांच्या प्रतिमेचे अनावरण व स्मरणिकेच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेचा बोऱ्या वाजला असून तिला स्थिरस्थावर करण्याची क्षमता असलेला एकही नेता सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे देशाची स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील महाआघाडी शासनाने मात्र शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेला कर्जमाफीचा निर्णय स्तुत्य आहे. महाराष्ट्र चुकीच्या हातात जावू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. श्री. पवारांनी शेतकरी विरोधी भाजप शासन घालवून शब्द अखेर खरा करुन दाखवला. 

कोल्हे राजकारणाचे शुद्धीकरण करतील

उद्योजक काकासाहेब चितळे म्हणाले, संभाजी महाराजांच्या भुमिकेमुळे घराघरात पोहोचलेले डॉ. कोल्हे हे त्यांचा आदर्श घेवून राजकारणाचे शुध्दीकरण करतील. सुहास मोहिते यांनी स्वागत केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची भाषणे झाली. माजी सभापती अजिंक्‍य पाटील, हरिदास पाटील, नगरसेवक राजेंद्र कुंभार, दिग्विजय सूर्यवंशी, अर्चना कदम, गजानन आलदर, माजी नगरसेवक दिलीप पाटील, पांडुरंग भिसे, महाबळेश्‍वर चौगुले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, सौ. एैश्‍वर्या मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ऍड. प्रताप हारुगडे यांनी आभार मानले. 

दिनकरतात्यांना राष्ट्रवादीची ऑफर..? 

लोकसभा निवडणुकीत जनतेने विशाल पाटील यांना कौल दिला असता तर लोकसभेत खांद्याला खांदा लावून काम केले असते. विधानसभा निवडणुकीत सांगलीवाडीने आणखी थोडी मदत केली असती तर आमदार म्हणून व्यासपीठावर आलो असतो, असे म्हणत पृथ्वीराज पाटील यांनी माजी आमदार दिनकर पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत मी अजिंक्‍यला सांगतोय, असे म्हणताच खसखस पिकली. तर डॉ. कोल्हे यांनी याचा संदर्भ देत सांगलीवाडीत हेच चित्र कायमस्वरुपी राहावे असे सांगत दिनकरतात्यांना अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीची ऑफर दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com