जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विहिरीतील पाणी पीत नाहीत, पाण्याला स्पर्श करत नाहीत, तोपर्यंत पाणी प्यायचे नाही असा संकल्प येथील समाजबांधवांनी केला होता.
-दिनकर नारायणकर
द. सोलापूर : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्वातंत्र्यपूर्व काळात मागासवर्गीयांनी बांधलेल्या ज्या पाणीपुरवठा विहिरीचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) केले होते, त्या ऐतिहासिक विहिरीचे (Historical Well) जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सरसावले आहे. या विहिरीवर बौद्ध स्तूप व परिसराचे सुशोभीकरणाच्या कामासाठी सुमारे ७२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.