
सांगोला : राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. हे मानधन सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शनिवारी (ता. २१) रोजी विधानसभेत केली.