
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या २०१४ च्या राजपत्रानुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना रुपये १ लाख ६१ हजार ४०० रुपयेप्रमाणे घरबांधणी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयात बैठक झाली. येथे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी संघटनेच्या वतीने डॉ. भारत पाटणकर सहभागी झाले.