गुलामगिरीमुक्त विकासाचे ध्येय - डॉ. भारत पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - जातीयवादी, धर्मांध शक्तींचा बीमोड करून आणि गुलामी संपवून विकास निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे, त्यासाठी आमचा हक्क हिरावणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी संघटित प्रयत्न करूया,’’ अशी शपथ श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी येथे झालेल्या निर्धार परिषदेत उपस्थितांना दिली. शाहू स्मारक भवनात झालेल्या निर्मिती विचार मंच निर्धार परिषदेत ते बोलत होते. 

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘पर्यायी विकास, गुलामी संपविणाऱ्या सार्वत्रिक विकासाचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी पडेल ती झळ सोसून संघर्षाला तयार आहोत. गुलाम करणाऱ्या व्यवस्थेचे सरकार चालविण्याची स्पर्धा येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत होईल. या सर्वांना विकासाचा मुद्दा आक्रोश करून सांगणार आहोत. गुलामी संपविणाऱ्या विकासाचा विजय मिळविल्याशिवाय थांबणार नाही.’’

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘या देशातील नैसर्गिक संसाधने आमची आहेत. पाणी, वारा, ध्वनीलहरी, जमिनी, जंगल अशी सर्व संपत्ती आमची आहे. भांडवलदार, जात दांडगे, धनदांडगे, स्त्रियांना गुलाम बनविणाऱ्यांनीही संपत्ती बळकावली आहे. आता आम्ही या साधन संपत्तीतील मुख्य हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही.’’

या देशाची लोकशाही, स्वातंत्र्य जपण्याची आवश्‍यकता आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. निर्मिती विचार मंच व अनिल म्हमाणे यांनी निर्धार परिषदेचे संयोजन केले. 

Web Title: Dr Bharat Patankar comment