
वारणावती : ‘‘गेली ३६ दिवसांपासून चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आजअखेर मंत्रालय पातळीवर बैठक होऊन निर्णय झालेला नाही. यासाठी आंदोलनाचा भाग म्हणून सोमवारी (ता. १७) वन कार्यालयावर मोर्चा काढला जाईल,’’ अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.