माणदेशी शास्त्रज्ञ डॉ. दिपक पिंजारी यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सभासदत्व 

सदाशिव पुकळे 
Monday, 20 July 2020

झरे (सांगली)- निंबवडे (ता. आटपाडी) येथील शास्त्रज्ञ डॉक्‍टर दीपक पिंजारी यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सभासदत्व मिळाले. डॉ. पिंजारी हे माणदेशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जाणारे शास्त्रज्ञ आहेत. असा बहुमान मिळवणाऱ्या तिघा महाराष्ट्रीयनपैकी ते एक आहेत. 

झरे (सांगली)- निंबवडे (ता. आटपाडी) येथील शास्त्रज्ञ डॉक्‍टर दीपक पिंजारी यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सभासदत्व मिळाले. डॉ. पिंजारी हे माणदेशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जाणारे शास्त्रज्ञ आहेत. असा बहुमान मिळवणाऱ्या तिघा महाराष्ट्रीयनपैकी ते एक आहेत. 

राष्ट्रीय विज्ञान अकादमी हि भारतामधील पहिली अकादमी असून त्याची स्थापना 1930 साली झाली आहे. ह्या अकादमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे शात्रज्ञ एकत्र येऊन विज्ञान विचारांचे देश पातळीवर एकत्र येऊन नवनवीन क्षेत्रात संशोधन करणे, नवनवीन समाजपयोगी तंत्रज्ञान निर्माण केले जाते. 
पदार्थविज्ञान क्षेत्रात अतिउच्च काम करणारे प्राध्यापक मेघनाथ साहा हे पहिले अध्यक्ष होते. राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे नियम आणि अटी ह्या इंग्लडच्या रॉयल सोसायटी च्या धर्तीवर बनवल्या गेल्या होत्या. 2015 साली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती शात्रज्ञ कलाम यांनी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अभिनंदन करून त्यांचे भारताला असणारे बहुमोल योगदानाबद्धल सविस्तर माहिती त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. 1930 साली 57 सदस्यांने चालू झालेली अकादमीचे आज 1800 च्यावर सभासद आहेत. दरवर्षी आपापल्या संशोधन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या 50 शात्रज्ञांना अकादमीचे सभासदत्व देण्यात येते. 

डॉ पिंजारी हे माणदेशामध्ये घडलेले शास्त्रज्ञ असून त्यांना अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ब्रिक्‍स युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, जागतिक युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, चीन सरकारचे संशोधनासाठी पुरस्कार, अमेरिकन सरकारची फूलब्राईट (Fulbright) फेलोशिप आदीचा समावेश आहे. डॉ. पिंजारी सध्या पंतप्रधानांचे शास्त्रीय सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांच्या कमिटीमध्ये ऊर्जा आणि पाणी क्षेत्रामध्ये त्यांना मदत करत आहेत. 

सध्या म्हसवड (ता.माण) येथे स्थायिक झालेले डॉ. पिंजारी हे मुळात केमिकल अभियांत्रीक आहेत. त्यांचे शिक्षण (B. Tech., M. Tech. आणि Ph.D) मुंबई येथील इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजी येथे झाले आहे. सध्या ते भारत सरकारचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक म्हणून मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्‍नॉलॉजीमध्ये काम करतात. तसेच विविध कंपन्यांना मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांनी समाजपयोगी अशी विविध उत्पादने बाजारपेठेमध्ये आणली आहेत. त्यांच्या नावावर 7 पेटंट असून 80 हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. 3000 पेक्षा जास्त वेळा जगामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. 

 

 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Deepak Pinjari is a member of the National Academy of Sciences