डॉ. नीलिशा देसाई यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक केंद्राच्या सहायक संचालिका डॉ. नीलिशा प्रकाश देसाई (वय ३३) यांचे पहाटे निधन झाले. गेली तीन वर्षे त्या खंबीरपणे कर्करोगाशी सामना करत होत्या. पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधक म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या. काल सकाळी राजारामपुरी १२ व्या गल्लीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. सकाळी ११ च्या सुमारास पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. 

‘स्टडी ऑन काँझर्वेशन ऑफ अर्बन विल्डरनेस ः कोल्हापूर सिटी’ या विषयावर त्यांनी ‘पीएच.डी.’साठी शोधप्रबंध लिहिला होता.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीच्या त्या सदस्या होत्या. नदी-तलावांचे प्रदूषण, वायू प्रदूषण, पश्‍चिम घाट आदी विषयांत त्या प्रबोधन आणि संशोधन कामांसह पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल, कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवाल निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. वनस्पती व पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण अभ्यासात त्या सतत कार्यरत व पर्यावरणविषयक अनेक प्रश्नांशी संबधित ‘मित्र’, ‘इन्व्हायरो लीगल फोरम’ यासह अन्य सामाजिक संस्थांच्या कामात सक्रिय सहभागी होत्या. त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या मागे आई व वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ६) आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Nilisha Desai No more