esakal | पंतप्रधान सहायता निधी, डॉ. सुजय विखे पाटलांचे एक कोटी रूपये आणि वरून मानधनही...
sakal

बोलून बातमी शोधा

sujay vikhe patil

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आपण विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले आहेत. मतदारसंघातील जे नागरिक इतर ठिकाणी अडकले आहेत, त्यांना आहे त्या ठिकाणीच मदत मिळावी, म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.

पंतप्रधान सहायता निधी, डॉ. सुजय विखे पाटलांचे एक कोटी रूपये आणि वरून मानधनही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक कोटीच्या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहायता कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाचे संकट रोखण्याचे उपाय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहनाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था व सामान्य नागरिक पुढे आले आहेत. पंतप्रधानाच्या या सहायता निधीत योगदान म्हणून आपणही कोटीचा निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

loading image