Dr. Shekhar Garde : मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी बनला आंतरराष्ट्रीय संशोधक

डॉ. शेखर गर्दे हे मूळचे कोल्हापूरचे. शहराच्या मध्यवस्तीतील गर्दे वाड्यामध्ये आई, वडील, बहिण आणि लहान भाऊ यांच्यासमवेत ते राहत. त्यांचे वडील रिक्षा चालक होते. आई वाड्यात शिकवणी घेत असे.
Dr. Shekhar Gadre
Dr. Shekhar Gadresakal
Updated on

डॉ. शेखर गर्दे हे मूळचे कोल्हापूरचे. शहराच्या मध्यवस्तीतील गर्दे वाड्यामध्ये आई, वडील, बहिण आणि लहान भाऊ यांच्यासमवेत ते राहत. त्यांचे वडील रिक्षा चालक होते. आई वाड्यात शिकवणी घेत असे. शेखर लहानपणापासूनच जिज्ञासू. विज्ञानातील विविध प्रयोग ते घरातच करून पाहत असत. बारावीनंतर उत्तम गुणांच्या जोरावर त्यांनी मुंबईतील ‘युडीसीटी’ मध्ये प्रवेश मिळविला आणि तेथून अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरींग) शिक्षण पूर्ण केले. (सध्या ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ‘आयसीटी’ या नावाने ओळखली जाते) १९९७ मध्ये त्यांनी डेलावेअर विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. लॉस आलामोस नॅशनल लॅबोरेटरी येथून त्यांनी पोस्ट डॉक्टरेट मिळवली.

सध्या ते अमेरिकेतील नामांकित रेन्सलेअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्‌यूटमध्ये अभियांत्रिकी विद्याशाखांचे अधिष्ठाता आहेत. या संस्थेत असणाऱ्या ११ अभियांत्रिकी विद्याशाखांचे एका अर्थाने ते प्रमुख आहेत. या संस्थेचे स्वरूप विद्यापीठाचे असून हे अमेरिकेतील पहिले अभियांत्रिकी विद्यापीठ आहे. त्याचबरोबर डॉ. गर्दे हे इलेन अँड जॅक पार्कर चेअर प्रोफेसर आहेत. डॉ. गर्देंचे संशोधन कार्यही मोठे आहे. ‘स्टॅटस्टिकल मेकॅनिकल थेअरी अँड मॉलेक्युलर मॉडलिंग अँड सिम्युलेशन टूल्स टू अंडस्टँड द रोल ऑफ वॉटर इन बायोलॉजिकल इंटरॲक्शन’ या विषयात त्यांनी संशोधन केले आहे.

Dr. Shekhar Gadre
Police Recruitment : लढवय्या मातेचा मुलगा जिद्दीने झाला पोलिस!

सध्या ते शरीरातील प्रोटिन्स कशा प्रकारे कार्य करतात. त्यांच्यातील असमतोलामुळे ज्या व्याधी उत्पन्न होतात. त्यावरील कोणते औषध काय भूमिका बजावते, यावर संशोधन करत आहेत. त्यांचे शंभरहून अधिक शोधप्रबंध प्रसिद्ध आहेत. प्रा. डॉ. शेखर गर्दे यांनी संशोधन, अध्यापन या माध्यमातून आपले वैश्विक शैक्षणिक नेतृत्व तयार केले आहे. कोल्हापूरमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असा आहे.

अमेरिकेत संशोधक, उद्योजक आणि ग्राहक, शासन यांच्यात एक चांगली परिसंस्था (इको सिस्टीम) तयार झाली आहे. त्यामुळे येथील संशोधनाचे रूपांतर उत्पादनात होते व त्याला बाजारपेठही उपलब्ध होते. अशा पद्धतीची परिसंस्था भारतातही तयार करता येईल. औषधे, उद्योग, शेती, उर्जा यांमधील संशोधनानंतर तयार होणाऱ्या सेवा, उत्पादने सर्वसामान्यांच्या आवाक्यात नक्की येतील फक्त त्यासाठी कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

- डॉ. शेखर गर्दे

Dr. Shekhar Gadre
Milind Bodake : हाफ मॅरेथॉनची सेंच्युरी करणारा अवलिया!

आईची साथ मोलाची

आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल डॉ. गर्दे म्हणतात,‘‘माझ्या आजवरच्या वाटचालीत आईची मला मोलाची साथ लाभली आहे. तिने दिलेले संस्कार, तिचे कष्ट यांमुळेच येथपर्यंतचा पल्ला गाठू शकलो. शाळेत जे शिक्षक होते त्यांनी विज्ञानाची गोडी लावली आणि शाळेतील मित्रांमुळे माझे भावविश्व समृद्ध झाले. यु.डी.सी.टी विद्यापीठात मला विज्ञान तंत्रज्ञानातील क्षितीजे खुली झाली. तेथील प्राध्यापकांनी खऱ्या अर्थाने वैश्विक दृष्टिकोन दिला. कोल्हापूर आणि ‘युडीसीटी’मधील दिवस संस्मरणीय आहेत.’’

भारतीय व्यक्तींकडे नेतृत्व क्षमता

डॉ. गर्दे म्हणतात, ‘विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सारथ्य भारतीय व्यक्तींकडे आहे. कारण भारतीयांकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, संवाद कौशल्य, उत्तम शिक्षण, परिश्रम करण्याची तयारी आणि नेतृत्व गुण असतात. याची सुरुवात आपले कुटुंब, समाजातून होते. काही गुण हे आपल्याला आपल्या संस्कृतीमधून मिळाले आहेत. म्हणूनच जगभरामध्ये भारतीयांना नेतृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात भारतीय व्यक्ती आणखी चमकदार कामगिरी करून नक्की दाखवतील.’

Dr. Shekhar Gadre
E-Learning : ‘ई-लर्निंग’मुळे महापालिकेच्या विद्यार्थ्यांची भरारी; शिष्यवृत्ती यादीत दुपट्ट वाढ

सामंजस्य करार वाढवावेत

भारतातील विद्यापीठीय संशोधनाबद्दल डॉ. गर्दे म्हणतात, ‘काही भारतीय संशोधन संस्थांमध्ये जाण्याचा योग आला. तेथे उत्तम संशोधन सुरू आहे. संशोधक विद्यार्थ्यांना साधनांची उपलब्धता होते. तेथे संशोधनास वातावरण तयार होण्यासाठी जगभरातील संशोधकांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे तसेच त्यासाठी परदेशी विद्यापीठे, नामांकित संशोधन संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करार केल्यास याचा खूप फायदा होईल. भारतीय संशोधकांना जगभर नावाजले जाते.’

परदेशातील अनेक संस्थांमध्ये भारतीय विद्वत्तेची छाप अगदी पूर्वीपासून ठळकपणे उमटत आली आहे. अगदी ‘नासा’सारख्या सर्वोत्तम संस्थेमध्ये भारतीयांच्या गुणवत्तेचे डिडींभ वाजले आहे. या मांदियाळीमधून पुढे आलेले एक नाव म्हणजे प्रा. डॉ. शेखर गर्दे. अमेरिकेतील रेन्सलेअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट (आर.पी.आय) या संस्थेचे ते अधिष्ठाता आहेत. कोल्हापुरातील तवन्नाप्पा पाटणे हायस्कूलमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार विद्यार्थी ते अमेरिकेतील अधिष्ठाता असा गर्दे यांचा प्रवास स्तब्ध करणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असाच आहे.

- ओंकार धर्माधिकारी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com