पान फिरवले की उलगडते कथा

सोलापूर - गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसह डॉ. तुषार पिल्ले.
सोलापूर - गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसह डॉ. तुषार पिल्ले.
Updated on

सोलापूर - येथील डॉ. तुषार पिल्ले यांनी एक हजार एक पानांचे फ्लिप बुक तयार केले आहे. प्रत्येक पान फिरविल्यानंतर दोन मित्रांच्या धडपडीची कथा ऍनिमेशन पद्धतीने उलगडली जाते. या पुस्तकाची नोंद "गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.

डॉ. पिल्ले म्हणाले, की प्रत्येक वर्षामध्ये एक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून दोन मित्रांची काल्पनिक कथा त्या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. प्रत्येक पानावर दोन मित्रांची ऍनिमेशन नोंद आहे. पान फिरविल्यानंतर दोन मित्रांवर आधारलेली काल्पनिक कथा पुढे जात राहते. एक हजार एक पानांवर काढलेली ही चित्रे फ्लिप बुक या नावाने ओळखली जातात. याबाबत गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. त्याला तीन ऑगस्ट 2018 मध्ये मंजुरी मिळाली. फ्लिप बुकचे काम पूर्ण करण्याचा अनुभव खूपच आव्हानात्मक असा होता. मात्र ध्येय निश्‍चित केल्याने तो मला पूर्ण करता आला, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

समाजातील प्रत्येक घटकाने दरवर्षी एक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. 2016 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील 111 प्रमाणपत्रे मला मिळाली होती. त्यानंतर जागतिक रेकॉर्डसाठी प्रस्ताव दाखल केला होता.
- डॉ. तुषार पिल्ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tukaram Mundhe effect on Food and Drug Administration action
Krishna river water diversion project for Solapur
Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Almatti Dam Flood Impact
Marathi News Esakal
www.esakal.com