esakal | तीन महिन्याच्या कुत्र्याचे कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

तीन महिन्याच्या कुत्र्याचे कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : तीन महिन्याच्या पाळीव कुत्र्याचे दोन्ही कान मुळातूनकापून त्याच्या नैसर्गिक ठेवणीत बदल केल्याप्रकरणी डॉक्टर सुनिल कोल्हे(रा. राजपूत कॉलनी, समृद्धीनगर, माळी मंगल कार्यालयासमोर) यांच्यावरसंजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणीप्रेमी ओंकारसूर्यवंशी (रा. सह्याद्रीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सह्याद्रीनगर येथील ओंकार सूर्यवंशी हा बीएस्सी शिकत आहे. त्याने डॉबरमॅन कुत्रा पाळला आहे.

दोन महिन्यापूर्वीसकाळच्या सुमारास तो कुत्रा घेऊन फिरवायला जात होता. तेव्हा मंगळवारबाजार येथील कोल्हे क्लिनिकचे डॉ. सुनिल कोल्हे यांची ओळख झाली. डॉ.कोल्हे यांनी ओंकारला तला तुमच्या कुत्र्यासारखा डॉबरमॅन जातीचा पाळीव कुत्रा पाहिजे असे सांगितले. त्यामुळे ओंकारने यशवंतनगर येथील संजय तुपेयाच्याकडील डॉबरमॅनचे पिलू १५ हजार रूपयांना विकत घेऊन डॉ. कोल्हे यांना दिले.

दरम्यान गुरूवारी (ता.३) ओंकारला त्याचा मित्र अथर्व शिंदे (रा. गांधीकॉलनी) याने मोबाईलवर कॉल करून डॉ. कोल्हे याने त्यांच्या पाळीवकुत्र्याचे कान क्लिनिकमध्ये कशाने तरी कापल्याचे सांगितले. त्यामुळेओंकारने क्लिनिकमध्ये जाऊन पाहणी केली. तेव्हा कुत्र्याचे दोन्ही कानमुळातून कापून नैसर्गिक ठेवणमध्ये बदल करून जखमी केल्याचे दिसले.ओंकारने प्राणिमित्र अजित काशिद व कौस्तुभ पोळ यांना हा प्रकार सांगितला.त्यानंतर या गंभीर प्रकाराबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन ओंकानेफिर्याद दिली. त्यानुसार प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० कलम ११ व३८, भारतीय दंड संहिता १८६० आणि महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ नुसार डॉ.कोल्हेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी असिफ सनदी तपास करत आहेत.

हेही वाचा: गणेशोत्सवाने दिला एसटीला आर्थिक हात

डॉक्टरकडूनच अघोरी प्रकार

डॉबरमॅन तसेच इतर जातीच्या श्वानामध्ये अशा प्रकारचे अघोरी प्रकार केलेजातात. हा प्रकार अत्यंत वेदनादायक आणि अनैसर्गिक आहे. श्‍वान सुंदरदिसण्यासाठी आणि स्पर्धेत नंबर मिळण्याच्या हेतूने श्वानाना त्यांचेनैसर्गिक अवयव गमवावे लागतात. या श्‍वानांना पुढील काळात विविध आजारांना सामोरे जावे लागते. माणसावर उपचार करणाऱ्या डॉ. कोल्हे याने अशा प्रकारचाअघोरी प्रकार स्वत: केल्यामुळे आश्‍चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

कान व शेपटी कापणे प्रतिबंधित

  1. श्‍वान प्रजनन आणि विपणन नियम २०१७ अंतर्गत कुत्र्याचे कान कापणे आणि

  2. शेपटी डॉकींग हे स्पष्टपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. असा प्रकार

  3. उघडकीस आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.श्‍वान प्रजनन आणि विपणन नियम २०१७ अंतर्गत कुत्र्याचे कान कापणे आणि

  4. शेपटी डॉकींग हे स्पष्टपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. असा प्रकार

  5. उघडकीस आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.

loading image
go to top