तासगाव पोलिस उपाधीक्षकांच्या चालकाने घेतली लाच 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

तक्रार यांनी निशिदी कॉर्नर, माळवाडी (ता. पलूस) येथे ऑनलाईन पद्धतीने पैसे लावून हार-जितचा खेळ हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात तक्रारदार यास सहकार्य करून कोणतीही कारवाई न करण्यासाठी विजय घुगरे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

सांगली - तासगाव पोलिस उपाधीक्षक यांच्या वाहनावरील चालक पोलिस नाईक विजय भगवान घुगरे (वय 34, अष्टविनायक नगर, वारणाली, सांगली) यास साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. भिलवडी येथील रत्नाकर बॅंकेसमोर हा सापळा रचला होता. 

अधिक माहिती अशी, की तक्रार यांनी निशिदी कॉर्नर, माळवाडी (ता. पलूस) येथे ऑनलाईन पद्धतीने पैसे लावून हार-जितचा खेळ हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात तक्रारदार यास सहकार्य करून कोणतीही कारवाई न करण्यासाठी विजय घुगरे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. चर्चेअंती साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास करण्यात आली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यात घुगरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

साडेचार हजार रुपये घेताना रंगेहात पकडले

तक्रारदार याच्याकडून भिलवडी येथील रत्नाकर बॅंकेसमोर पैसे घेण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा लावला. विजय घुगरे याने साडेचार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार त्याच्याविरोधात भिलवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घुगरे याची नेमणूक तासगाव पोलिस ठाण्यात आहे. प्रतिनियुक्तीवर तो उपाधीक्षकांच्या गाडीवर चालक म्हणून होता. अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक राजेंद्र साळुंखे, निरीक्षक प्रशांत चौगुले, जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, अशोक तुराई, संजय संकपाळ, राधिका माने, सारिका साळुंखे-पाटील, बाळासाहेब पवार यांचा कारवाईत सहभाग होता. 

हेही वाचा - झटपट निकाल ! विनयभंग प्रकरणी अवघ्या पाच दिवसांत शिक्षा 

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर 

लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार द्या. याशिवाय 1064 या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार देता येऊ शकते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver Of Tasgaon Police Deputy Superintendent Arrested In Bribe case