नागपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर शिराळ्यावर ड्रोनची नजर...लोकांना दर्शनासाठी जाण्यास बंदी 

शिवाजीराव चौगुले 
Friday, 24 July 2020

शिराळा(सांगली)- नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व इतर पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार असून वन विभागातर्फे प्रथमच ड्रोनचा वापर करता येत आहे. याची चाचणी घेण्यात आली. 

शिराळा(सांगली)- नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व इतर पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार असून वन विभागातर्फे प्रथमच ड्रोनचा वापर करता येत आहे. याची चाचणी घेण्यात आली. 

जगप्रसिद्ध असणारी शिराळची नागपंचमी 25 जुलैला आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने अंबामता मंदिरात लोकांना दर्शनासाठी जाण्यास बंदी आहे. प्रतिकात्मक नाग प्रतिमेची मिरवणूक ही निघणार नाही. फक्त मोजक्‍या लोकांच्या समवेत मानाची पालखी निघणार आहे. तरी ही न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. कोणी ही जिवंत नाग पकडू नये, मिरवणूक काढू नये अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तरी ही खबरदरी म्हणून शासकीय यंत्रणा सज्य झाली आहे.

वनविभागाचे 164 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उपवनसंरक्षक 1, विभागीय वनसंरक्षक 1, सहायक वनसंरक्षक 4, वनक्षेत्रपाल 10, वनपाल 23, वनरक्षक 45, वनमजुर 80 असे एकूण 164 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 10 गस्ती पथक आहेत. 24 ते 26 जुलै पर्यंत तीन दिवस ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

इथे असणार नजर 
शिराळा शहरा बरोबर ग्रामीण भागातील तडवळे,उपवळे, ओझर्डे, सुरुल, कुरळप या गावावर ड्रोनची नजर असणार आहे. आज ड्रोनच्या माध्यमातून अंबामाता मंदिर, सोमवार पेठ, मोरणा धरण, उपवळे, तडवळे परिसराची चाचणीघेण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, देवकी ताशीलदार, बाबा गायकवाड, संपत देसाई उपस्थित होते.  

 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drone sighting on Shirala in the background of Nagpanchami . People are not allowed to go for darshan