दुष्काळ जाहीर झाला; उपाययोजना कधी?

दावल इनामदार
बुधवार, 23 जानेवारी 2019

बाजारात जनावरांना...
एक लाख रुपये किमतीच्या बैलजोडीला बाजारात ५० ते ६० हजार रुपये, ७० हजार रुपये च्या  म्हशीला ३० ते ३५ हजार रुपये, ६ ते ७ हजार रुपये किमतीच्या शेळीला ३ ते ४ हजार रुपये असा  भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.

ब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगलवेढा तालुक्यातील दुष्काळीजन्य भागातील परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत बागा जगवायच्या कशा व जनावरला काय घालायचे. शेतकरी चिंतेत असून जनावरे विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना कवडीमोल भाव असल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यातील सर्व भागात खरीप व रबी पीके पावसाअभावी उत्पादन न झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.ज्वारीचे शिवार म्हणून ओळख असलेल्या या काळ्या भोर जमीनी नापिकीच्या स्थितीत असून रोजगार ही नसल्यामुळे  शेतकरी संकटात सापडला आहे. नदीकाठ भागातील परिसरात सध्या ऊस तोड़ी मुळे अधिक मोल देऊन वाढे, चिपाढे घेतले असलेतरी दूध उत्पादनात घट झाली असून दुधाचे कमी दर, पशुखाद्याचे वाढते भाव ,चाराटंचाइ अशा अनेक अड़चणीस सामोरे जावे लागत आहे तसेच शिवारात ज्वारीचे पीके नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत चाऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने, कडबा पेंढीचे व  चाऱ्यांचे भाव वधारले आहेत.

जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकरी ,पशुपालकास पडला आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून,उन्हाळ्या अगोदरच पिण्याच्या पाण्यासाठी लहान बालकाना व ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. नापिकीच्या स्थितीत चाऱ्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. येत्या काही दिवसांत उन्हाळ्या मधे पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती आणखी तीव्र होणार असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मात्र बाजारातही भाव मिळत नसल्याने  कमी दरात शेतकऱ्यांना जनावरे विकावी लागत आहेत.

बाजारात जनावरांना...
एक लाख रुपये किमतीच्या बैलजोडीला बाजारात ५० ते ६० हजार रुपये, ७० हजार रुपये च्या  म्हशीला ३० ते ३५ हजार रुपये, ६ ते ७ हजार रुपये किमतीच्या शेळीला ३ ते ४ हजार रुपये असा  भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.
 
दुष्काळ जाहिर झाला पण उपाय योजना कधी करणार ?...
पाणी-चारा कोठून आणणार?...

टंचाईच्या परिस्थितीत जिथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तेथे जनावरांना जगविण्यासाठी पिण्याचे पाणी आणि चारा कोठून आणणार, याबाबतची चिंता पशुपालक, शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे मिळणाऱ्यां कमी भावात जनावरे विकण्याचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर आली आहे.

"या भागातील जनावराचे वाईट हाल होत असून नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाला तीन महिने झाले तरी हे सरकार कुठलेही उपाययोजना न करता नुसते चाल ढकल करीत आहे तरी या सरकारने पिण्यास पाणी, जनावरांना चारा ,फळबाग अनुदान याची तात्काळ उपाय योजना करावी.
 - आमदार भारत भालके

दुष्काळी जाहिर झाला पण मुक्या जनावरास चारा कधी मिळणार ? शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून  सरकारने चारा छावणी व चारा डेपोचा भ्रष्टाचार पाहता चारा दावणीला द्यावा."
- संतोष कोळसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought situation in solapur district