esakal | धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Baby

कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवर

sakal_logo
By
विजय लाड

सातारा : कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. दीड महिन्याची ही मुलगी अत्यवस्थ असून या प्रकरणी बापाला कोयना पोलीसानी अटक केली आहे. यामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली आहे.

कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ या बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या दीड महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याच्या हेतूने दोन वेळा जमिनीवर आपटले. आणि तिला लगेचच पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये टाकले. घरा बाहेर गेलेल्या आई घरी आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने अत्यवस्थ झालेल्या मुलीला तातडीने उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सदर मुलगी सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे.

loading image
go to top