दुधगाव कर्मवीरांची कर्मभूमी...रयतच्या स्थापनेआधी दहा वर्षे दुधगावमध्ये रोवली शैक्षणिक कार्याची बिजे 

dudhgaon photo.jpg
dudhgaon photo.jpg

,सांगली- मला दगड द्या मी त्याला आकार देतो. मोकळी जागा द्या त्याचे नंदनवन करतो. या संकल्पनेतून सुरू झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामिण महाराष्ट्राचा कायापालट करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची संकल्पना सांगली जिल्ह्यातील दुधागावमध्ये उमलली होती. कर्मवीरांचे स्नेही दुधगावचे भाऊसाहेब कुदळे यांच्या दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या कामातूनच कर्मवीरांनी रयतचे स्वप्न पाहिले आणि ग्रामिण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने हे स्मरण 

"रयत'ची पहिली शाळा हे जरी कऱ्हाडमधील काल्याची. मात्र पहिले वस्तीगृह दुधगावमधले. त्याचा हा रंजक प्रवास अनेकांना माहित नसेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कर्मवीर सातवी शिक्षण झाल्यानंतर व्यापारानिमित्त फिरत असत. किर्लोस्कर व कुपर कंपनीचे नांगर घेऊन ते दुधगाव परिसरामध्ये यायचे. येथुन त्यांचे आजोळ असलेल्या कुंभोज गावी जायचे. या भटकंतीदरम्यान त्यांच्या मित्रासमोर त्यांनी सर्व धर्मियांसाठी शिक्षण मिळावे यासाठी आपण संस्था सुरू करण्यासंदर्भात विचार मांडले. परंतु ही संकल्पना फार पूर्वीपासूनच दुधगाव मध्ये सुरू असल्याचे त्यांना त्यांच्या मित्रांकडून समजले. हे पाहण्यासाठी कर्मवीर आण्णा दुधगाव मध्ये दाखल झाले. त्यांच्या डोक्‍यात जी संकल्पना रुंजी घालत होती ती संकल्पना प्रत्यक्षात भाऊसाहेब कुदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुधगावमध्ये आधीपासून राबवली होती. इथूनच भाऊसाहेबांशी त्यांचा स्नेह वाढत गेला. रयतच्या उभारणीची प्रेरणा मिळाली. 

1909 मध्ये "दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची" स्थापना झाली. तर 1919 मध्ये रयत ची स्थापना झाली. त्यावेळी भाऊसाहेब स्वातंत्रपूर्व काळात स्कूल बोर्डचे चेअरमन होते. या काळात त्यांनी पोलीस पाटील शामगोंडा पाटील व इतर सहकार्याना सोबत घेऊन 1909 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून बोर्डिंग सुरू केली. कर्मवीरांनी या संस्थेसाठी त्या काळात पाच रुपयाची देणगीही दिली होती. तसेच या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी एक मुठ धान्य योजनाही राबवली होती. तेव्हा भाऊसाहेबांच्या वाड्यात ही शाळा भरायची. 

कर्मवीरांनी नंतरच्या काळात रयतचा वटवृक्ष उभा केला. या दोघांच्या ऋणानुबंधातून दुधगावच्या पंचक्रोशीत वारणेबरोबरच शिक्षणाची गंगोत्रीही वाहिली. शैक्षणिकदृष्ट्या प्रगत दुधगावचे हे शिल्पकार आहेत. भाऊसाहेब कुदळेंचा वाडा व कर्मवीरांचा चौकात उभारलेला पुतळा आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे. अण्णांची जन्मभूमी ऐतवडे असली तरी कर्मभूमी दुधगाव ठरले. पुढे भाऊसाहेबांनी पुढे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची संस्था रयतला जोडून दिले. अण्णानीही संस्थेला भाऊसाहेबांचे नाव देऊन ऋणानुबंध जपले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com