कोरोनामुळे सांगली महापालिकेतील या निवडीची लांबल्या

Due to Corona, this selection in Sangli Municipal Corporation was delayed
Due to Corona, this selection in Sangli Municipal Corporation was delayed
Updated on

सांगली : कोविड 19 चा इफेक्‍ट प्रभाग समिती सभापती निवडीवरही झाला आहे. मुदत संपूनही या सभापतींना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता कोवीड-19 च्या काळात नूतन सभापती निवडीचा कार्यक्रम घ्यावा का? याबाबतचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने शासनाच्या नगरविकास खात्याकडे मागितला आहे. तो काय येतो यावर सभापतींचा निर्णय होणार आहे. 

महापालिकेच्या चार प्रभाग समित्या सभापतींची मुदत 31 मार्चला संपली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या निवडी झाल्या होत्या. त्यावेळी प्रभाग समिती एकच्या सभापतीपदी उर्मिला बेलवलकर, दोनचे सभापती विनायक सिंहासने, तीनच्या सभापतीपदी मदीना बारूदवाले, चारच्या सभापतीपदी गायत्री कल्लोळी यांची निवड झाली होती. त्यांची मुदत 31 मार्च 2020 ला संपली आहे. त्यामुळे नूतन सभापतींची निवड एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. परंतू कोरोनाच्या संकटामुळे त्या लांबल्या आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने एप्रिल व मे महिना यातच गेला. महापालिकेची महासभा, स्थायी समितीची सभाही घेता आली नाही. 

मे अखेरपासून लॉकडाऊनमध्ये शिथीतला मिळाली. त्यानंतर स्थायी समितीची सभा ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतली होती. तर येत्या गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा सोशल डिस्टन्स पाळून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर महापौर गीता सुतार यांनी महासभा घेण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. 

याचबरोबर प्रभाग समित्यांच्या सभापतींची मुदत संपल्याने नूतन सभापतींच्या निवडी घ्याव्यात का? याबाबत महापालिका प्रशासनाने शासनाच्या नगरसचिव खात्याकडे अभिप्राय मागितला आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शनानंतर चारही प्रभाग समिती सभापती निवडीवर निर्णय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com