कोरोनामुळे सिध्दनाथ जकाई त्रैवार्षिक भेट यात्रा रद्द; श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, प्रशासनाचा निर्णय

Due to Corona Siddhanath Zakai visit festival canceled ; Decision of Srinath Devasthan Trust & Administration
Due to Corona Siddhanath Zakai visit festival canceled ; Decision of Srinath Devasthan Trust & Administration

खरसुंडी (जि. सांगली ) ः लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित होणारी सिद्धनाथ जकाई त्रैवार्षिक भेट यात्रा कोरोच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने रद्द केली आहे. ट्रस्ट, मानकरी व प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय झाला. पारंपारिक विधीवत औपचारिक श्री नाथाची पालखी वाहनातून मानकरी व भाविकांचे मानपान मोजक्‍याच लोकांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.

श्रीनाथ जकाई भेट यात्रा अधिक मासात तीन वर्षातून होत असते. श्री नाथाच्या या उत्सवास अधिक महत्त्व आहे. तालुक्‍यातील सर्व गावांमधील नाथांचे भक्त या यात्रेस हजेरी लावतात. त्याच बरोबर नाथाचे मानकरी पालखी मार्गावरील आपल्या गावात औष्णिक व नैवेद्य करून उत्सव साजरा करत असतात. खरसुंडी येथून नाथाची पालखी घोडेखूर येथे आरती करण्यात येते. याठिकाणी धावडवाडी, कानकात्रेवाडी, आवटेवाडी गावचे मानकरी हजर राहतात. या गावचे मानकरी गावच्या ठिकाणी देवाचा पोशाख व मान पान करत असतात. हा उत्सव मोठा व मानकऱ्यांचा उत्साहाचा असतो. 

नेलकरंजी येथे श्री नाथाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते. या ठिकाणे पूर्ण गावच्या भाविकांच्या वतीने पोशाख नैवेद्य करून साखर पेढे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात येते. नेलकरंजी गावाला यात्रेचे स्वरूप येते. परगावी असणारे सर्वच नागरिक या उत्सवास हजेरी लावतात. नेलकरंजी नंतर मानेवाडी मेटकरवाडी गुलाल की मानकर यांच्यावतीने मानपान करण्यात येते. संध्याकाळी श्री नाथाची पालखी संध्याकाळी जकाई भेटीसाठी जकाई दऱ्याकडे रवाना होते.

असा हा सोहळा पारंपारिक पद्धतीने चालत आलेला आहे. मात्र कोरोनामुळे हा सोहळा रद्द झाला आहे. श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात मानकरी,ग्रामस्थ,प्रशासन यांची बैठक झाली. बैठकीस ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, सर्व विश्वस्त, पोलीस निरीक्षक देवकर, धावडवाडी कानकात्रेवाडी आवटेवाडी गावचे मानकरी, नेलकरंजीचे सरपंच बाबासाहेब भोसले, चंद्रकांत भोसले, मानेवाडीचे सरपंच अमोल खरात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com