सर्व्हर डाऊनमुळे दाखले मिळण्यात अडचणी 

सर्व्हर डाऊनमुळे दाखले मिळण्यात अडचणी 
Updated on

ढालगाव -  प्रांत तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने मराठा दाखले मिळण्यास अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू असूनही तरुणांत नाराजी व्यक्त होत आहे. 

सोळा टक्के मराठा आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून झाला. जात प्रमाणपत्र मिळाल्यास मेगा भरतीत बेरोजगार तरुणांना आरक्षणचा फायदा होणार आहे. अनेक तरुण मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तालुका किंवा ई सेवा केंद्रात नोंदणी करतात. महिना महिना प्रमाणपत्र मिळत नाहीत. तशा तक्रारी वाढल्या आहेत. 

ई सेवा केंद्र चालकांचे म्हणणे आहे, की आम्ही प्रस्ताव नोंदणीसाठी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवतो. प्रांत कार्यालयातून दाखले मिळत नाहीत. आमचीच अडचण निर्माण झाली आहे. अनेकजण आमच्यावरच चिडतात. आम्ही काय करायचं. मराठा जात नाही तर सर्वच दाखले मिळण्यास सर्व्हर डाऊनच्या कारणाने विलंब होत आहे. ही अडचण दूर करावी, अशी मागणी आहे. 

'दाखले मिळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. जलदगतीने दाखले देण्याचे काम सुरू आहे. कोणी दाखले वेळेत देत नसतील तर माझ्याकडे तक्रार द्या. संबंधितांवर कारवाई केली जाईल.'' 

- डॉ. विकास खरात, प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
How to apply for MHADA Sangli housing?
Why did Sangli ACB register a bribery case?
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com