तिजोरी उघडण्याचा आवाज झाला; अन्‌ चोरट्यांचा प्रयत्न फसला... काय झाले वाचा 

Due to vigilance of the citizens thwarted the big attempt of theft at Nerle
Due to vigilance of the citizens thwarted the big attempt of theft at Nerle
Updated on

नेर्ले (जि. सांगली) : येथील गावाच्या पूर्व भागातील ईशान्य बाजूस असणाऱ्या वाघाचा कोपरा परिसरात रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी राहत्या घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घरात झोपलेल्या सुनिता शिवाजी रणखांबे यांनी तिजोरीचा आवाज ऐकून आरडाओरडा केल्याने चोरटे सापडले. त्यांच्यावर कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विकास प्रकाश माने वय (24), रोहित सुरेश काटे (वय 26), सोमनाथ यशवंत कुंभार (वय 35), राहुल सुरेश जाधव (वय 35, सर्व रा. शनिवार पेठ कराड), विजय अशोक जांभळे (वय 39, रा. नेर्ले) अशी चोरट्यांची नावे आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हे चोरटे येथील विजय जांभळे याच्या घरी जेवायला आले होते. रात्री नशा करून ते गावाच्या आग्नेय बाजूस रस्त्यालगत सुनिता रणखांबे याचे घराजवळ रात्री दीड वाजता तीन चाकी वडाप गाडी घेऊन आले. चोरट्यांनी गाडी बाजूला लावून शेजारील घरांना बाहेरून कडी लावली. सुनीता रणखांबे यांच्या घरासमोरील दरवाज्याची कडी उचकटून घरात प्रवेश केला.

त्यांनी तिजोरीचे दार उघडले. दाराचा आवाज होताच सुनिता यांना जाग आली. त्यांनी त्यांच्या मुलास उठवून घरात कोणतरी शिरले आहे असे सांगितले. त्याचवेळी दोघांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरांनी पळ काढला. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत चोरट्याचा पाठलाग केला व पोलिसांनाही बोलवले.

महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीस गाडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा मोठा प्रयत्न फसला. आरोपींवर कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार शिवाजी यादव तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com