

कोकरुड : कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील येळापूर (ता. शिराळा) येथील बसस्थानकावर मोटारसायकल व डंपर यांच्यात झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. सादिक नारायण यादव (वय ४५) आणि किसन विष्णू यादव (३५) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.