ग्रहण काळात भाजी चिरणाऱ्या महिलेने दिला सदृढ बाळास जन्म...ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत नसल्याचे सिद्ध

धर्मवीर पाटील 
Monday, 21 September 2020

इस्लामपूर (सांगली)- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने येथील गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिले. तसेच ग्रहणात भाजी चिरली होती. त्या महिलेने एका सदृढ आणि निरोगी कन्येला जन्म दिला आहे. त्यामुळे ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. 

इस्लामपूर येथील समृद्धी चंदन जाधव यांनी 21 जून रोजी झालेल्या सूर्यग्रहण काळात गर्भवती असताना ग्रहणकाळात भाजी चिरणे, पाने-फुले-फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे, मांडी घालून बसणे, एवढेच नव्हे तर सोलर फिल्टरमधून ग्रहणही पाहिले. ग्रहणकाळात गर्भवतीने अशा काही गोष्टी केल्यास जन्माला येणारे अपत्य व्यंग घेऊन येते किंवा बाळाला जन्मताच दोष तयार होतात, असे गैरसमज आहेत. गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम महाराष्ट्र अंनिस सातत्याने करत आहे. 

अंनिस कार्यकर्त्यांनी जाधव कुटुंबियांचे प्रबोधन करून ग्रहण काळामध्ये मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही याची खात्री दिली. त्यामुळे कुटुंबीय ग्रहणकाळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहणकाळात समृद्धी यांनी धाडसाने ज्या गोष्टी करायच्या नाहीत असे सांगितले होते, ते केले. समृद्धीची सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. नुकतेच तिला कन्यारत्न झाले. कन्या सदृढ आणि निरोगी असून कुटुंबात आनंदी वातावरण बनले आहे. प्रा. डॉ. नितीन शिंदे, प्रा. तृप्ती थोरात, विनोद मोहिते, प्रा.बी. आर. जाधव, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. प्रमोद गंगनममाले, प्रशांत इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले. 
............ 

कोट 
""ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर किंबहुना त्याच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही हा माझा अनुभव आहे. अं नि स च्या कार्यकर्त्यांनी माझं व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे.'' 
-समृद्धी जाधव 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the eclipse, a woman chopping vegetables gave birth to a strong baby. Proving that the eclipse does not affect human life