कवठेएकंदला यंदा दसऱ्याची आतषबाजी रद्द; यात्राही नाही

Dussehra fireworks canceled at Kavtheekand this year; No yatra also
Dussehra fireworks canceled at Kavtheekand this year; No yatra also
Updated on: 

कवठेएकंद (जि . सांगली) : आपल्या धार्मिक भावना प्रथा आणि परंपरांचा प्रशासन म्हणून आम्ही आदर करतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे यात्रा आयोजित करणे हे लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर्षी कवठेएकंदची यात्रा व आतषबाजी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मांडली. 

दसऱ्यानिमित्त कवठेएकंद तालुका तासगाव येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व कवठेएकंद ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याला तहसीलदार कल्पना ढवळे, तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट, पोलीस उपनिरीक्षक विश्रांत मदने, कवठेएकंदचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी प्रांताधिकारी शिंगटे म्हणाले," कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीमुळे हजारो नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. कोरोनाचा धोका संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत यात्रा पालखी सोहळा अथवा अतिषबाजी ला परवानगी दिली जाणार नाही. पंढरपूरची वारी असेल किंवा तासगावचा रथोत्सव असेल याठकाणी भाविकांनी घेतलेली सहकार्याची भूमिका कवठेएकंद ग्रामस्थांनी घ्यावी.

पुढील वर्षी प्रशासन आपल्याबरोबर पुन्हा उत्सवात सहभागी होईल." पोलीस उपाधीक्षक शेंडगे यांनी सुरुवातीलाच शासनाच्या कसे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अटीवर यात्रेच्या आतषबाजीच्या निमित्ताने लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या आवाहनानंतर जर कोणत्याही प्रकारे कायदा मोडण्याचा नियम भंग करण्याचा प्रकार केल्यास, कायदा आपले काम करेल. समाजाच्या आपल्या कुटुंबाचा विचार करून प्रशासना बरोबर राहण्याची विनंती यावेळी अश्विनी शेंडगे यांनी केली. 

ग्रामस्थांची सहकार्याची ग्वाही 
बैठकीमध्ये ग्रामस्थांनी सोशल डिस्टंसिंग पाडत यात्रा आयोजित करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्याचबरोबर पालखी सोहळा आतषबाजी यासंदर्भात ग्रामस्थांची असणारी मागणी प्रशासनाकडे आग्रही पणे मांडली. मात्र, त्याचबरोबर प्रशासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचे त्याचबरोबर प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ही ग्वाही दिली. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com