
सांगली : महापालिकेच्या ‘ई-बस’ सेवेला नव्या वर्षात सुरवात होईल. त्यासाठीच्या चार्जिंग स्टेशन व बस आगाराासाठीच्या कामास १४ कोटींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यासाठी चार एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. या जागेतील वहिवाटीवरून न्यायालयातील सुनावणी गुरुवारी आहे.