esakal | वीज बिल तक्रारीचे निरसन करण्यासाठी ई-मेल, मोबाईल क्रमांक
sakal

बोलून बातमी शोधा

mseb bill.jpg

सांगली-  वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही ग्राहकांचे समाधान न झाल्यास ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावरून तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. 

वीज बिल तक्रारीचे निरसन करण्यासाठी ई-मेल, मोबाईल क्रमांक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-  वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही ग्राहकांचे समाधान न झाल्यास ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावरून तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन काळात मिटर रिडिंग व बिल वाटप बंद होते. एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापराची बिले दिली गेली. जून 2020 पासून प्रतिबंधक क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सूचनांचे पालन करून मिटर रिडिंग घेतले जात आहे. तसेच बिलांचे वाटप केले जात आहे. जूनची बिलाची रक्कम जास्त दिसत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्याचे निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने एक लिंक दिली आहे. तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक मदत कक्ष स्थापन केला आहे. ग्राहकांशी वेबिनार आणि फेसबुक लाईव्ह संवाद साधला जात आहे. मिटर रिडिंग व बिल वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. महावितरणकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनातून ग्राहकांचे समाधान न झाल्यास energyminister@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर तसेच मोबाईल क्रमांक 9833567777 आणि 9833717777 या क्रमांकावरून तक्रारीचे निरसन केले जाणार आहे.

loading image
go to top