कौजलगीत बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; गायीच्या शेणाचा वापर

कौजलगीत पर्यावरणपूरक उपक्रम; दहा हजार राख्या तयार, प्लास्टिकला फाटा
कौजलगीत बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; गायीच्या शेणाचा वापर

बेळगाव: पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) १० हजार राख्यांची निर्मिती कौजलगी (ता. गोकाक) येथे करण्यात आली आहे. प्लास्टिकला फाटा आणि गोवसंवर्धनाचे महत्व वाढविण्याच्या उद्देशाने याठिकाणी पंचवीस एकरमध्ये गोशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातूनच पहिला प्रयोग म्हणून या राख्या बनविण्यात आल्या आहेत.

बनशंकरी गो संवर्धन व अनुसंधान केंद्राची स्थापना कौजलगी (ता. गोकाक) येथे करण्यात आली आहे. याच संस्थेच्या माध्यमातून राख्या तयार करण्यात आल्या आहेत. संस्थेतर्फे पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले जातात. त्यापैकीच यावेळी गायीच्या शेणापासून राख्या तयार करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. संस्थेकडून गोसंरक्षण, गोसंवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे. कौजलगीत केशवस्मृती ट्रस्ट व सेंद्रीय कृषी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बनशंकरी गो संवर्धन व अनुसंधान केंद्र साकारले आहे. एकात्मिक जैविक शेती, पंचगव्य, आयुर्वेद, अपारंपरिक उर्जास्रोत विकास, स्वदेशी गोवंश संवर्धन आणि संरक्षण पंचसूत्री या प्रकल्प साकारण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

कौजलगीत बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; गायीच्या शेणाचा वापर
बेळगावात शांतता भंगचा प्रयत्न; नरगुंदकर भावे चौकात पुतळा उभारणार?

यंदा येथे तयार केलेल्या राख्यांना मागणी वाढली असून दहा हजार राख्या तयार केल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. कौजलगी, गोकाकपाठोपाठ बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील किराणा दुकान, राखी विक्री स्टॉल आणि विविध सेवाभावी संस्थांकडे राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या राख्या ग्रामीण भागातील बचट गट चालविणाऱ्या महिलांकडून तयार करून घेतल्या आहेत. यामुळे महिलांना रोजगार मिळाला आहे.

अशा बनविल्या राख्या

कौजलगीतील बनशंकरी गो संवर्धन व अनुसंधान केंद्राकडून विशेष प्रक्रियेद्वारे राख्या तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा गायीचे शेण सुकवून यात डिंक, तुळशीची पाने आणि इतर वस्तूंचे मिश्रण करण्यात आले. ते एका साच्यात घालून वेगवेगळ्या आकाराच्या १० हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरणपूरक असून त्या प्लास्टिकला पर्याय ठरला आहे.

कौजलगीतील बनशंकरी गो संवर्धन व अनुसंधान केंद्रातर्फे यंदा इको फ्रेंडली राख्यांची निर्मिती केली जात आहे. आतापर्यंत १० हजार राख्या तयार केल्या असून त्या विक्रीसाठी विविध ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

- किशोर निखार्गे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com