ED raids at businessmen Pakher brothers house of in Sangli marathi Crime News rak94
ED raids at businessmen Pakher brothers house of in Sangli marathi Crime News rak94

ED Raid in Sangli : सांगलीत बड्या व्यापाऱ्यांच्या घरावर ईडीचे छापे! परिसरात खळबळ

Published on

सांगलीतील त्रिकोणी बाग परिसराक आज, २३ जून रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरु आहे. सांगलीत एकूण २ पथकांद्वारे छापमारी झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळीच ईडीचे पथके सांगली शहरात दाखल झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पथकाच्या मदतीने शिवाजीनगर मधील पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान देखील तैनात आहेत.

ED raids at businessmen Pakher brothers house of in Sangli marathi Crime News rak94
Sanjeev Jaiswal : १५ कोटींची एफडी अन् मढ आयलंडला अर्धा एकरचा भूखंड! ईडीच्या छाप्यात IAS अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड

ईडीची ही पथकं सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या शिवाजीनगर येथील दोन बंगल्यात गेली आहेत. तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांचा नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com