नेर्लेत साडेआठ एकर ऊसाला आग; लाखोंचे नुकसान 

विजय लोहार
Saturday, 21 November 2020

नेर्ले : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍चिमेला असणाऱ्या विठ्ठल बिरुदेव बनाच्या परिसरातील सर्व्हे नंबर 697 मधील उभ्या साडे आठ एकर आडसाली ऊसाला आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.

नेर्ले : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍चिमेला असणाऱ्या विठ्ठल बिरुदेव बनाच्या परिसरातील सर्व्हे नंबर 697 मधील उभ्या साडे आठ एकर आडसाली ऊसाला आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.तोड चालू असल्याने मजूर व शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. इस्लामपूर नगरपालिका व हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने करून सात ते आठ तासात आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. 

येथील सर्व्हे नंबर 697 मध्ये दोन दिवसापूर्वी उभ्या उसाला आग लागली होती. येथे राजारामबापू कारखाना व यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना यांच्या ऊस तोडी चालू होत्या. तोड चालू असताना अचानक ऊसाला आग लागली .विझलेल्या उसाला वाऱ्यामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले.यावेळी इस्लामपूर नगरपालिकेचे अग्निशामक दल व हुतात्मा कारखाना येथून अग्निशामक दलाच्या गाड्यां घटनास्थळी दाखल झाल्या. 

अग्निशामक दलाने पाच-सहा तासाच्या अथक प्रयत्ना नंतर आग विझली. शंकर माने ,बाबू श्रीपती माने ,जालिंदर यशवंत पाटील ,जालिंदर बापू पाटील ,शिवाजी बापू पाटील ,तानाजी बापू पाटील ,बाजीराव बापू पाटील ,आनंद हरी साळुंखे या सर्व शेतकऱ्यांचा ऊस आगीमध्ये भस्मसात झाला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृष्णेचे संचालक गिरीष पाटील,नेर्ले शेतकी गटाचे आनंदराव पाटील,श्री. मोहिते,राजारामबापू कारखान्याचे सुधाकर मोरे आणि श्रीकांत माने यांनी भेट दिली.संचालक गिरीश पाटील यांनी शेतकऱ्यांचा ऊस ताबडतोब जाण्यासाठी यंत्रणा लावली. बाजीराव पाटील , जयसिंग पाटील ,जयदीप पाटील, रणजित पाटील, कुलदीप पाटील, शुभम माने, अमोल माने यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कारखान्याने ऊस कपात करू नये अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight and a half acres of sugarcane fire in Nerlet; Loss of millions