भेसळीच्या संशयावरून सांगलीत साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त 

शैलेश पेटकर
Friday, 11 September 2020

सांगली- खाद्यतेल रिपॅकींग, उत्पादन व विक्री करणाऱ्या 5 आस्थापनांकडून भेसळीच्या संशयावरून 8 लाख 52 हजार 875 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने तडजोड प्रकरणी 5 आस्थापनांना एकूण 1 लाख 9 हजार रूपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली. 

सांगली- खाद्यतेल रिपॅकींग, उत्पादन व विक्री करणाऱ्या 5 आस्थापनांकडून भेसळीच्या संशयावरून 8 लाख 52 हजार 875 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने तडजोड प्रकरणी 5 आस्थापनांना एकूण 1 लाख 9 हजार रूपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली. 

खाद्यतेल तपासणी मोहिमेत राजेंद्र ट्रेडर्स अँड कंपनी (वखारभाग सांगली), वर्षा सेल्प कार्पोरेशन (मार्केट यार्ड सांगली), भाग्योदय सेल्स कार्पोरेशन (एमआयडीसी कुपवाड), श्री वारणा विभाग सह. ग्रा. मंडळ लि. वारणा बझार, ( शाखा ऐतवडे खुर्द, वाळवा), राधेकृष्ण एक्‍सट्रॅक्‍शन (एमआयडीसी, कुपवाड) याठिकाणी तपासणी करण्यात आली. याठिकाणी जुने वापरलेल्या डब्यांचा वापर होत असल्याचे आढळले. भेसळीच्या संशयावरून 8 लाख 52 हजार 875 रूपये किंमतीचा 7 हजार 260 किलो ग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. तसेच राजेंद्र ट्रेडींग अँड कंपनी, भाग्योदय सेल्स कार्पोरेशन, परेश इंडस्ट्रज, देव स्वीटस (शामरावनगर, सांगली), पाकिजा स्वीटस (सांगली) याठिकाणी तपासणीत झाली. अहवालामध्ये त्रुटी आढळल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. 

स्वच्छतेचा अभाव, कामगारांच्या माहितीत त्रुटी व विना नोंदणी व्यवसाय व इतर त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड प्रकरणे दाखल करण्यात अली होती. त्यानुसार हजारे किराणा स्टोअर्स सावळी (ता.मिरज), वरद कन्फेक्‍शनरी (गवळी गल्ली सांगली), गणेश डिस्ट्रब्युटर्स (नेमिनाथनगर सांगली), रोहन उदय सुर्यवंशी वाहन (एमएच 12 जीटी 8866), नवरत्न डिस्ट्रब्युटर्स (मार्केट यार्ड सांगली) यांना एकूण 1 लाख 9 हजार रूपयांचा दंड झाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight and a half lakh items seized in Sangli on suspicion of forgery