
सांगली : आजोबा एकीकडे अन् आजी दुसरीकडे. या दोन जीवांची घालमेल येथील बसस्थानकावर पाहायला मिळाली. एसटीचे सुरक्षारक्षक व वाहतूक नियंत्रकांनी तत्परता दाखवत बसस्थानकावर हरवलेल्या आजोबांची आजीशी भेट घडवून आणली आणि आजोबांना पाहताच आजीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.