
इस्लामपूर : चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने वृद्धेच्या गळ्यातील व नाकातील सोन्याचे दागिने चोरी करण्यासाठीच मुवाज ईलाही मुलाणी (वय २१, ईदगाह मैदानाजवळ, इस्लामपूर) याने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक संजय हारूगुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंगळवारी (ता. ३) सकाळी सव्वानऊ ते सव्वानऊच्या सुमारास कापूरवाडी (ता. वाळवा) येथील नरसोबा मंदिराजवळील ओढापात्रात हाफीनाजी मदनसाब मुल्ला (वय ६५, शिवनगर, इस्लामपूर) मृतदेह आढळला होता. यासंदर्भात त्यांचा मुलगा दावल मदनसाब मुल्ला (वय ४१ शिवनगर, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली होती.