निवडणूक व्यवस्थेची होतीये पाहणी ; बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांची केंद्रांना भेट

election centre check from collector in belgaum list of voters also done
election centre check from collector in belgaum list of voters also done
Updated on

बेळगाव : लोकसभा पोटनिवडणुकीची मतदारयादी पडताळणी आणि नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या कामाची पाहणी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रविवारी (१३) केली. काम काळजीपूर्वक करण्यासह यादीत कोणत्याही स्वरूपाच्या उणिवा राहणार नाहीत त्याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील आझमनगर आणि विश्‍वेश्‍वरय्यानगरसह तालुक्‍यातील विविध केंद्रांना भेट देऊन निवडणुकीचे काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

ग्रामपंचायत निवडणुकींतर्गत पहिल्या टप्प्याचे मतदान २२ डिसेंबरला होत आहे. तर २७ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होईल. त्यानंतर म्हणजे ३० डिसेंबरला मतमोजणी आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा पोटनिवडणूक तसेच महापालिका निवडणूक घेतली जाणार आहे. त्याची तयारी निवडणूक विभागाकडून सुरु आहे. मतदार यादी तयार केली जात आहे. त्याशिवाय पुढील महिन्यांत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविली जात आहेत. त्यासाठी बेळगाव शहर, तालुकासह बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीचे काम सुरु आहे. त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह केली. 

बेळगाव शहरातील गांधीनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, कणबर्गी रोड आदी केंद्रांना भेटी दिल्या. तेथे निवडणूक संबंधीचे कसे सुरु आहे, त्याची माहिती घेतली. अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा अडचणी जाणून घेतल्या. कामासाठी प्रशिक्षण मिळाले आहे का? काम करताना कोणती अडचण येत आहे का? त्याची माहिती घेतली. कोणत्याही समस्या उद्‌भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्या सोडवून घ्याव्यात. मतदारांकडून कोणत्या स्वरुपाची तक्रार आल्यास त्वरीत सोडविल्या जाव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह जिल्हा आणि तालुका निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com