सोलापूर: प्रणिती शिंदे यांच्या पराभवाची भिती | Election Results 2019

सकाळवृत्त सेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे 9 व्या फेरीअखेर पिछाडीवर आहेत.

सोलापूर : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे 9 व्या फेरीअखेर दोन हजार 426 मतांनी पिछाडीवर आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार महेश कोठे 20838 मतांसह आघाडीवर आहेत. त्यांच्या आघाडीची प्रतिक्षा करत शहराध्यक्ष प्रकाश वाले पक्ष कार्यालयात बसुन आहेत. कार्यकर्ते चिंतेत दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर मुलीच्या विजयासाठी शिंदे यांनी कंबर कसली होती. तर प्रणिति शिंदे यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केले होते. त्यांच्या पिछाडीने कांग्रेस चिंतेत असुन आता प्रणिति शिंदे यांचा पराभव झाला तर नेतृत्व कोण करणार याची चिंता पदाधिकारी करु लागले आहेत.

उमेदवार पक्ष मिळालेली मते

प्रणिती शिंदे : कॉंग्रेस : 17340

दिलीप माने : शिवसेना : 12299

नरसय्या आडम : माकप : 0

फारूक शाब्दी :एमआयएम : 18442

महेश कोठे : अपक्ष : 20838

आघाडी ---- अपक्ष महेश कोठे - 2426


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends morning