स्थायी सदस्य निवडी 18 ला : महासभेचा अजेंडा जाहीर...30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड शक्‍य  

जयसिंग कुंभार
Friday, 11 September 2020

सांगली-  स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आता सत्ताधारी भाजपमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 18 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता महासभेत निवडी होती. त्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना ठराव करून पत्र पाठवण्यात येईल. साधारण 30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड होणे अपेक्षित आहे. 

सांगली-  स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आता सत्ताधारी भाजपमधून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 18 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता महासभेत निवडी होती. त्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना ठराव करून पत्र पाठवण्यात येईल. साधारण 30 सप्टेंबरपुर्वी सभापती निवड होणे अपेक्षित आहे. 

भाजपचे सहयोगी सदस्य गजानन मगदुम, अनारकली कुरणे, राजेंद्र कुंभार, मोहना ठाणेदार अशा चार सदस्यांमध्ये चुरस आहे. आयुक्तांनी पत्रकारांना जुन्याच पत्राचा दाखला देऊन निवडी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. तथापि सदस्य आक्रमक होताच त्यांनी माघार घेत निवडीसाठी शासनाशी पत्रव्यवहार केला. त्यांनंतर नगरविकास मंत्रालयाने ऑनलाईनसभांद्वारे स्थायी समितीच्या निवडी घ्याव्यात, असे लेखी आदेश दिले. 

स्थायी समितीची मुदत नियमानुसार 31 ऑगस्ट रोजी संपली होती. तत्पुर्वी महापालिका अधिनियमानुसार महासभेत त्या निवडी आणि सभापती निवड होणे गरजेचे होते. सभापती संदीप आवटी यांच्यासह भाजपचे पाच, कॉंग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचा एक सदस्य बाहेर पडणार आहे. आयुक्तांच्या फ्लॉप शो नंतर आता स्थायी सभापती व सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

स्थायीसाठी इच्छूक सदस्यांमध्ये भाजपकडून शिवाजी दुर्वे, प्रकाश ढंग, नसीम नाईक, पांडुरंग कोरे, गजानन आलदर, संजय यमगर, सुनंदा राऊत, सविता मदने, उर्मिला बेलवलकर. 
कॉंग्रेसकडून वहिदा नायकवडी, संतोष पाटील, उमेश पाटील, करण जामदार, शुभांगी साळुंखे तर 
राष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, संगीता हारगे, पवित्रा केरिपाळे आदींच्या हालचाली सुरु आहेत. त्यानंतर सभापती निवड असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of standing Members on 18th: Agenda of General Assembly announced. Speaker can be elected before 30th September