खरसुंडी परिसरात विहिरीतील मोटारी चोरीचे प्रमाण वाढले...पोलिस तपास अद्याप सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

खरसुंडी ( सांगली)- आटपाडी तालुक्‍यातील खरसुंडी पोलीस दूर क्षेत्राच्या परिसरात गेली दोन वर्षात शेतकऱ्यांच्या विहीरीतील जवळपास शंभर इलेक्‍ट्रिक मोटारींची चोरी झाली आहे. मात्र चोऱ्यांचा तपास लागला नाही. एका चोरीचा तपास लागला. शेतकऱ्यांच्या मोटारीची चोरी थांबणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खरसुंडी ( सांगली)- आटपाडी तालुक्‍यातील खरसुंडी पोलीस दूर क्षेत्राच्या परिसरात गेली दोन वर्षात शेतकऱ्यांच्या विहीरीतील जवळपास शंभर इलेक्‍ट्रिक मोटारींची चोरी झाली आहे. मात्र चोऱ्यांचा तपास लागला नाही. एका चोरीचा तपास लागला. शेतकऱ्यांच्या मोटारीची चोरी थांबणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खरसुंडी पोलीस दूर क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात गेली दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारींची चोरी होत आहे. धावडवाडी, खरसुंडी,घांणद, घरनिकी, वलवण, मिटकी, चिंचाळे या गावातील शेतकऱ्यांच्या पाण्यातील व विहिरीवरील मोटारींची चोरी करण्यात आली आहे. या चोरीबाबत बरेच शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या चोरी झालेल्या या मोटारींचा तपास अद्याप लागलेला नाही. खरसुंडी गावच्या चार ते पाच शेतकऱ्यांच्या तीन ते चार वेळा मोटारी चोरीस गेल्या आहेत. पोलिसात तक्रार करूनही तपास लागत नसल्याने शेतकरी हतबल बनला आहे. 

खरसुंडी गावच्या शेजारी असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या दोन मोटारी चोरीला गेल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांना एका व्यक्तीने टीप दिली. पोलिसांनी सापळा रचून दोन चोरांना रंगेहात पकडले. एक खरसुंडी तर दुसरा चिंचाळे गावचा मिळून आला. इतर मोटारी चोरीबाबत यांच्याकडे पोलिसांनी तपास केला. मात्र त्याचा तपास लागलेला नाही. वरचेवर मोटारी चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व शेतीची पाणी यंत्रणा थांबू लागली आहे. मोटार चोरीतून सापडलेल्या चोराकडून इतर चोरीची माहिती मिळू शकेल असे खरसुंडी दूर क्षेत्रातील पोलिसांचे मत झाले होते. मात्र पुढे काही प्रगती झालेली नाही.

खरसुंडी पोलीस दूर क्षेत्र कार्य क्षेत्रांमधील शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटार चोरी थांबण्यासाठी आटपाडी पोलिसांनी याबाबत तपास करण्याची गरज आहे. चोरांचा तपास न लागता चोरटे मोकाट रहात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तपास पोलिसांतर्फे लागत नसल्याने शेतकऱ्यांनी आता तक्रार करणे थांबवले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electric motor theft has increased in Kharsundi area. Police investigation is still going on