वीजसेवेचा विट्यात खेळखंडोबा; नागरिक, यंत्रमागधारक, व्यावसायिक त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

महावितरणच्या विटा विभागांतर्गत विटा उपविभाग 1 व 2, एमआयडीसी-पारे, लेंगरे, नागेवाडी, आळसंद या सहा शाखांसाठी 75 पेक्षा जास्त वायरमनची आवश्‍यकता आहे. मात्र नियमानुसार 74 पदे मंजुर आहेत. सध्या कामाचा बोजा सांभाळण्यासाठी या विभागाकडे केवळ 31 कायमस्वरुपी व काही कंत्राटी वायरमन उपलब्ध आहेत.

विटा (सांगली) ः काही दिवसांपासून विटा विभागात वायरमनच्या कमतरतेमुळे वीजसेवेचा खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार होणारा पाऊस, कोरोनाचे संकट आणि वीज पुरवठा वारंवार खंडित होणे यामुळे नागरीक, व्यापारी, यंत्रमागधारक, उद्योजक त्रस्त झालेत. 

महावितरणच्या विटा विभागांतर्गत विटा उपविभाग 1 व 2, एमआयडीसी-पारे, लेंगरे, नागेवाडी, आळसंद या सहा शाखांसाठी 75 पेक्षा जास्त वायरमनची आवश्‍यकता आहे. मात्र नियमानुसार 74 पदे मंजुर आहेत. सध्या कामाचा बोजा सांभाळण्यासाठी या विभागाकडे केवळ 31 कायमस्वरुपी व काही कंत्राटी वायरमन उपलब्ध आहेत. परिसरातील खंडीत वीजेचे दोष काढून विजपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. त्यामुळे अक्षरश: खेळखंडोबा झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व्यापारी व औद्योगीक क्षेत्रातील विजेaची मागणी कमी आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने विटा शहर व परिसरातील वीज खंडीत होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. तर कर्मचाऱ्यांअभावी खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरु होण्यासाठी आठ आठ तास प्रतिक्षा करावी लागते. 

मागील अठवड्यातील वादळी पावसामुळे तर खंडीत वीज पुरवठ्याची कमाल मर्यादा पण पार केली आहे. वीज ग्राहक, यंत्रमाग उद्योजक, सहाय्यक अभियंता व वायरमन कर्मचाऱ्यांथि वाद व भांडणाचे प्रकार सुरू आहेत. 

विट्यासाठी 22 वायरमनची गरज आहे. केवळ 8 कायम व काही कंत्राटी वायरमन उपलब्ध आहेत. तीन महिला असल्याने त्यांना प्रत्यक्ष वीजेच्या लाईनवर काम करण्यात मर्यादा येतात. केवळ दुरध्वनी सेवेत कार्यरत ठेवावे लागते. बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नविन कर्मचारी मिळत नसल्याची धक्कादायक माहिती व हतबलता अधिकाऱ्याकडून व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजुला नविन वायरमन घ्यायचे त्यांना प्रशिक्षण द्यायचे ते तयार झाले, की मग त्यांची मराठवाड्यात बदली केली जाते. असा प्रकार सांगली जिल्ह्यात काही वर्षापासुन सात्तत्याने सुरू असल्याची माहितीही मिळत आहे. 

""विटा यंत्रमाग संघाने अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी पुरेसे कायम कर्मचारी त्वरीत नेमुन वीजपुरवठा व देखभाल नियमीत करावी अन्यथा धरणे आंदोलन करू. 

-किरण तारळेकर, 
अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity outages in the vita; Citizens, machine owners, professionals suffering from