कोवाड : कौलगे जंगलात (Kaulage Forest) आठ दिवसांपासून मुक्काम ठोकलेला हत्ती दिवसा महाराष्ट्र हद्दीत, तर रात्री कर्नाटक हद्दीत वावर करत आहे. जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या शेती पिकांतून धुडगूस घालत हत्ती (Elephant) शेतातील साहित्यांची मोडतोड करीत आहे. जंगलाजवळ गावे असल्याने सीमाभागातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे.