Sangli : हत्तीच्या प्रतिकृतीची सांगली शहरात मोडतोड; संशयितास अटकेची ‘हिंदू एकता आंदोलन’ची मागणी
बबलू हत्तीची फायबरची सात फूट उंचीची प्रतिकृती उभारली होती. त्याची परिसरातील नागरिक मनोभावे पूजा करत. लहान मुलांचे आकर्षण होते. महिन्यापूर्वी हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एकाने रात्रीच्या सुमारास प्रतिकृतीची मोडतोड केली.
सांगली : ‘शहरातील त्रिमूर्ती चौकातील हत्तीच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी हिंदू एकता आंदोलनतर्फे करण्यात आली.