एसटी कामगार संघटनेचा एल्गार...प्रलंबित वेतनासाठी सात ऑक्‍टोबरची डेडलाईन 

ST.jpg
ST.jpg
Updated on

सांगली-  कोरोना आपत्तीत जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना जुलै व ऑगस्टचे वेतन मिळाले नाही. या दोन महिन्यांसह सप्टेंबरचे वेतन 7 ऑक्‍टोबरपर्यंत न मिळाल्यास 9 रोजी राज्यभर आत्मक्‍लेश उपोषण केले जाणार आहे. सांगलीत देखील आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय अध्यक्ष अशोक खोत व विभागीय सचिव नारायण सूर्यवंशी यांनी दिली. 

कोरोना आपत्तीत एस. टी. कामगारांनी जिवाची बाजी लावून काम केले. कोरोनामुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. धोका पत्करून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी काम करीत आहेत. परंतू त्यांना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्यामुळे ते हवालदील झालेत. उपासमारीमुळे काहींना अन्यत्र रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक आहे. परंतू निधी नसल्याचे कारण सांगून राज्य सरकारकडे मदत मागितली आहे. परंतू वेतनासाठी मदत मिळेनाशी झाली आहे. 

एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळावेळी पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. मात्र वेतन मिळण्यास विलंब होत आहे. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. तसेच सप्टेंबरच्या वेतनाची तारीखही जवळ आली आहे. त्यामुळे सात तारखेपर्यंत दोन महिन्याचे प्रलंबित वेतन आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळाले पाहिजे. तीन महिन्याचे एकत्रित वेतन न मिळाल्यास नऊ सप्टेंबर रोजी संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आत्मक्‍लेश उपोषण करण्याचा निर्णय श्री. ताटे व श्री. शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार सांगलीत देखील नऊ सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती श्री. खोत व श्री. सूर्यवंशी यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Crack Husband Murder Case; Wife and Alleged Lover Taken into Custody
Ashadhi Ekadashi special trains from Miraj
Aitwade Khurd highway land acquisition protest
Shaktipeeth Highway Sagareshwar Wildlife Sanctuary controversy
Marathi News Esakal
www.esakal.com