झरेत गजबजलेल्या बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य

The empire of filth in a market crowded with springs
The empire of filth in a market crowded with springs

झरे : झरे (ता. आटपाडी) येथे स्वच्छतागृह व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. सध्या स्वच्छता ग्रह म्हणून तलाठी कार्यालयाच्या शेजारी सिमेंट पाईप उभा करून त्याचाच स्वच्छता ग्रह म्हणून उपयोग केला जातो. परंतु त्या सिमेंट पाईपच्या भोवताली घाणीचे साम्राज्य आहे. त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका आहे. 

सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील, आटपाडी, माण, खटाव तालुक्‍याच्या सीमेवरील मोठी बाजारपेठ असून, आठवडी बाजार भरतो. वाहनांची सतत रहदारी नागरिकांची रहदारी सतत गजबजलेली बाजारपेठ म्हणून परिचित आहे. 

दवाखाना, बॅंक, पतसंस्था, शैक्षणिक दोन संस्था, जुनियर, सीनियर कॉलेज, लग्न समारंभ असो, शेतीचे साहित्य असो, कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू या बाजारपेठेमध्ये मिळते. त्यामुळे बाजारपेठेत सतत नागरिकांची रहदारी असते. नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बाजारपेठेत येतात. बॅंकेच्या व्यवहारासाठी, दवाखान्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणास्तव नागरिकांची सतत रहदारी असते. 

परंतु गावांमध्ये किंवा बसस्थानका शेजारी नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तसेच बाहेरून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी ग्रामपंचायतने स्वच्छतागृह उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

बाजारपेठ मोठी असल्यामुळे स्वच्छतागृह होणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छतागृहासाठी ग्रामपंचायतमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. 
- धनंजय वाघमारे, सदस्य ग्रामपंचायत, झरे 

महिला व पुरुषासाठी वेगवेगळे स्वच्छतागृह बांधकामासाठी 15 वित्त आयोग मधून निधी खर्च करणार असून बस स्थानक परिसर, ओढा मात्र स्मशानभूमी परिसर व तलाठी कार्यालयाशेजारी लवकरच बांधकाम सुरू करणार आहे. 
-सिंधू माने, सरपंच झरे 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com